बामणवाडा स्मशानभूमीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:17+5:302021-06-17T04:20:17+5:30

बामणवाडा येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विस्तारलेल्या संपूर्ण परिसरातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी राजुरा - चुनाळा मार्गावर बामनवाडा गावाची ...

Bad condition of Bamanwada cemetery | बामणवाडा स्मशानभूमीची दुरवस्था

बामणवाडा स्मशानभूमीची दुरवस्था

बामणवाडा येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विस्तारलेल्या संपूर्ण परिसरातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी राजुरा - चुनाळा मार्गावर बामनवाडा गावाची स्मशानभूमी आहे. परंतु या स्मशानभूमीची मागील अनेक दिवसांपासून दैनावस्था झालेली आहे. स्मशानभूमी मधील शेड टिनाचे असल्यामुळे ते जीर्ण झाले आहे व वादळ वाऱ्यामुळे टिनाचे पत्रे उडून गेले आहे. स्मशानभूमी मधील बोअरवेल गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. शोकसभा घेण्यासाठी सदनिका नाही. उन्हाळ्यात सावली देणारी झाडे सुद्धा नाही. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता सुद्धा नाही. या स्मशानभूमीच्या दुरूस्तीसाठीचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, आ. सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Web Title: Bad condition of Bamanwada cemetery