शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अवधी संपूनही रक्कम देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: February 7, 2015 00:36 IST

आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

चंद्रपूर : आदर्श नागरी सहकारी पत संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या अनेक खातेदारांच्या मुदत ठेव व पिग्मी खात्यातील रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शाखा व्यवस्थापक अभिकर्त्याना जीवे मारण्याची देत आहे. अनेक संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनसुद्धा कारवाई होत नाही आणि रक्कम परत करत नसल्याने त्रस्त झालेल्या अभिकर्ता व खातेदारांनी तत्काळ रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून घुग्घुस येथील गांधी चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी संस्थेचे अभिकर्ता नंदू सपाट, नंदू नंदवाणी, एस. पी. गेडाम, रामिलवार, खातेदार विनोद वैरागडे, डॉ. विलास बोबडे यांच्यासह अनेक खातेदार उपस्थित होते.आदर्श नागरी सहकारी संस्था चंद्रपूर शाखा घुग्घुसच्या चार अभिकर्त्यांनी विविध खातेदारांकडून लाखो रुपये जमा करुन संस्थेच्या कार्यालयात जमा केले. तशी खाते पुस्तकात नोंद आहे. अनेक खातेदारांच्या ठेवीची मुदत ठेवीचा अवधी संपून एक वर्ष झाले. मात्र सदर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अध्यक्ष, सचिव आणि संस्थेचे व्यवस्थापक राजेश कारकाळे यांनी या विषयात वेळकाढू धोरण स्वीकारले आहे, तर व्यवस्थापकाकडून जीवे मारण्याच्या धमक्या देत कुठे जायचे आहे, तेथे जा. अधिकारी आमचे आहेत, असे सांगितले जाते. याप्रकाराबाबत त्रस्त अभिकर्ता आणि खातेदारांनी ४ सप्टेंबरला घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सहाय्यक निबंधक आर. टी. अगले यांच्याकडे अहवाल मागितला. मात्र चार महिने होऊनही तक्रारीची व पोलिसांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या मागितलेला अहवाल अद्यापही देण्यात आला नाही.सदर शाखा चंद्रपूर जिल्ह्यापुरती मर्यादित असली तरी संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना खातेदार बनवून घेतले. त्यांच्या ठेवीची रक्कम मिळावी म्हणून अनेकदा चकरा मारल्या. नागपूर अधिवेशनाच्या काळात सहकार मंत्र्याचे लक्ष वेधले असता त्यांनी संस्थेच्या अध्यक्ष, सचिव आणि व्यवस्थापकांना बैठकीसाठी बोलावले मात्र हे अधिकारी बैठकीला उपस्थित झाले नाहीत, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. या शाखेत एकूण १५० खातेदार असून त्यांची ३० लाखांपेक्षा अधिक रक्कम आहे. गेल्या काही दिवसांपासून सदर संस्थेच्या कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने खातेदारांची तारांबळ उडाली आहे. रक्कम परत न मिळाल्यास १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. यावेळी अनेक खातेदार उपस्थित होते. (वार्ताहर)