शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

१५ तालुक्यांचे वर्षभरातील दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:01 IST

जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती.

ठळक मुद्दे४९ वर्षांनंतर प्रथमच बदल : नवीन पर्जन्यमानावरून ठरणार दुष्काळ व पूरस्थिती

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १९६१ ते २०१० या कालावधीतील जिल्हा, तालुकानिहाय पर्जन्यमानाचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाने तब्बल ४९ वर्षांनंतर प्रथमच बदल केला असून तालुक्यांचे वर्षभरातील नविन दरमहा सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला यापुढे दुष्काळ व पूरस्थिती जाहीर करताना या सरासरी पर्जन्यमानाचाच आधार घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सर्वाधिक सरासरी पर्जन्यमान सिंदेवाही (१२८९ मिलिमीटर) तर कोरपना तालुक्याचे सर्वात कमी (९९९.८० मिलिमीटर) निश्चित झाले आहे.जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवामान शास्त्राचा अभ्यास करून नवीन पर्जमान्य निश्चित करणे काळाची गरज असल्याने भारतीय हवामान विभाग पुणे कार्यालयाने अभ्यासाला सुरूवात केली होती. १९६१ ते २०१० या कालावधीतील राज्याच्या सर्व तालुकानिहाय सरासरी पर्जमान्यमानाचा विचार करण्यात आला होता. या पर्जन्यमानाचे विश्लेषण करून हवामान विभागाने न्निष्कर्ष जाहीर केले. त्यानुसार तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमाही नव्याने निश्चित केले आहे.पर्जन्यमानाची अशी होते नोंदसर्वच तालुक्यात मंडळस्तरावर पर्जन्यमान मापक यंत्रे बसविली आहेत. या यंत्रांची देखभाल व नोंदी करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपविण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. तालुका यंत्रणेकडून घेतलेल्या नोंदी वरिष्ठांकडे पाठविल्या जातात. दरवर्षी मान्सून कालावधीत शासनाकडून तयार केलेले पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार होणारेअहवाल जिल्हा व तालुकानिहाय अहवालावर आधारीत असतात. याचे विश्लेषण हवामान विभाग करते. यापुढे जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हवामान विभागाची सरासरी नवीन पर्जन्यमान आकडेवारी अधिकृत मानली जाणार आहे.भारतीय हवामान विभागाने १९६९ ते २०१० या कालावधीतील तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्यमान जिल्हा व तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले. यासंदर्भात जारी केलेला शासन निर्णय प्राप्त झाला आहे. दुष्काळ तसेच पूरस्थिती जाहीर करताना हे नवीन सरासरी पर्जन्यमान आधारभूत ठरणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान