शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाचे बिल रखडल्याने आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: March 27, 2016 00:33 IST

गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल न मिळाल्याने ...

भंगाराम (तळोधी) : गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बिल न मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून होळीच्या दिवशी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने ते बचावले. मात्र त्याच्या घरकुलाची गहाळ झालेली फाईल अजूनपर्यंत यंत्रणेच्या हाती लागली नाही. त्यामुळे त्याच्या घराचे बांधकाम ठप्प पडले असून लाभार्थ्यावर आता कर्जाचा डोंगर कोसळला आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील कपील लक्ष्मण आत्राम (४५) या आदिवासी समाजाच्या व्यक्तीला घरकुल मंजूर झाले. सदर घरकुलाची रक्कम ९५ हजार इतकी होती. दरम्यान, कामाच्या प्रगतीनुसार या अनुदानाची रक्कम खर्च करावयाची असते. अशावेळी ३५ हजार रुपये अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून लाभार्थ्याला रक्कम प्राप्त झाली. या रकमेतून त्यांनी घराचे बांधकाम सुरू करून सध्या त्याचे काम सज्जा लेवलपर्यंत आले आहे. यानंतर लाभार्थ्याने दुसऱ्या हप्त्याचे बिल मिळावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाचा दाखला व कामाचे सकृतदर्शनी फोटो घेवून गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालय गाठले. त्याने येथील घरकुल विभागात बोमनवार यांच्याकडे घराचे काम सुरू असल्याचा पुरावा सादर केला. सोबतच पुढील काम सुरू करण्यासाठी लाभार्थ्याने त्यांच्याकडे दुसऱ्या हप्त्याच्या बिलाची मागणी केली. तेव्हा बोमनवार यांनी तुमच्या घरकुलाची कार्यालयीन फाईल उपलब्ध नसल्याचे सांगून ती गहाळ झाल्याचे बोलून दाखविले. यामुळे त्यांची मानसिकता खराब झाली. होळीला राहत्या घरी या विवंचनेतूनच त्यांनी विष प्राशन केले. याची माहिती लाभार्थ्यांच्या पुतण्याला कळताच त्याने ताबडतोब कपील यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. आता ते धोक्याबाहेर आहे. (वार्ताहर)