शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना तातडीची आर्थिक मदत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 01:08 IST

वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे.

स्वत: करावा लागतो खर्च : तातडीच्या निधीची तरतूद नाहीवरोरा : वन्यप्राणी मानवावर हल्ला करून जखमी केल्याच्या घटनामध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची नोंद तातडीने वनविभागात केली जाते. रुग्णालयात जावून वन कर्मचारी अधिकारी जखमीचे बयाण नोंदवितात. परंतु तातडीच्या आर्थिक मदतीची तरतूद नसल्याने जखमींना तातडीची मदत मिळत नसल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक व्यक्ती शासकीय रुग्णालयाच्या व्यतिरिक्त असलेल्या औषधोपचारापासून वंचित राहात आहेत.वन्यप्राण्यांचा हल्ला शेतात वा गावात होत असतो. या घटना नित्याच्या झाल्या आहेत. शेतीच्या हंगामात अशा अनेक घटना घडत असतात. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीस उपचाराकरीता जखमीचे आप्तेष्ठ मिळेल त्या वाहनाने शासकीय-खाजगी रुग्णालयात दाखल करून त्याबाबत वन विभागाच्या कार्यालयात नोंद करतात. नोंद केल्यानंतर वन कर्मचारी व अधिकारी जखमीचे बयाण घेवून निघून जातात. जखमीला प्राथमिक उपचारानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास खाजगी रुग्णवाहिकेमधून न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा आप्तेष्टांजवळ पैसे नसल्यास जखमीला तिष्ठत राहावे लागते. शासकीय रुग्णालयात औषधी नसल्यास आर्थिक कमकुवतपणामुळे बाहेरून औषधी घेता येत नाही. ंअशी एक ना अनेक संकटे जखमी व त्यांच्या आप्तांसमोर उभी राहतात. त्यामुळे जखमीना तातडीचा आर्थिक निधी मिळावा, याकरिता तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे.वनाधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वत: करतात मदत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती वनधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी किंवा रुग्णालयात जखमीचे बयाण नोंदविण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांच्यामधील माणुसकीचा झऱ्याला पाझर फुटते. जखमीची अवस्था बघून अनेक वनाधिकारी व वनकर्मचारी आपल्या खिश्यामधून वन्यप्राण्याच्या हल्ल्यातील जखमींना अनेकदा मदत करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)