रेतीघाटावरील पैशांच्या वादातून हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:10 IST2026-03-04T15:56:11+5:302026-03-04T16:10:45+5:30

Chandrapur : तलवारी-दांड्यांनी मारहाण; चार वाहनांची तोडफोड, पोकलेन जाळली, तिघांना अटक

Attack over money dispute at Retighat; One dead, two seriously injured | रेतीघाटावरील पैशांच्या वादातून हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जण गंभीर

Attack over money dispute at Retighat; One dead, two seriously injured

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा (चंद्रपूर) :
चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीच्या बामर्डा रेतीघाटावर पैशांच्या वादातून झालेल्या भीषण मारहाणीत भारतीय जनता पक्षाचे पुलगाव शहर महामंत्री भरत दयानंद नागपाल (वय ४२, रा. पुलगाव, जि. वर्धा) यांची तलवार व दांड्यांनी बेदम मारहाण करत निघृण हत्या करण्यात आली. तर दोघे गंभीर जखमी झाले. १ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.

या हल्ल्यानंतर चार वाहनांची तोडफोड करण्यात आली असून एक पोकलेन मशीन जाळण्यात आले. जखमींमध्ये पंकज वानखेडे (३९) व अनिल ठोंबरे (३०), दोघेही रा. हिंगणघाट, जि. वर्धा यांचा समावेश आहे. माहितीनुसार, गितेश सातपुते यांनी शासनाकडून बामर्डा रेतीघाट दोन वर्षांसाठी लिलावात घेतला. त्यानंतर हा घाट पंकज वानखेडे, अनिल ठोंबरे, भारत नागपाल आदींना सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांत चालवण्यासाठी देण्यात आला. संबंधितांनी टप्प्याटप्प्याने रक्कम सातपुते यांच्या खात्यात जमा करून रेतीउपसा सुरू केला होता. सातपुते यांच्याकडे घाटाची मुदत जून २०२६ पर्यंत होती. २५ जानेवारी रोजी घाट परत घेत उर्वरित ९८ लाख ६४ हजार ६२१ रुपये फेब्रुवारीत परत देण्याचे ठरल्याचे सांगितले जाते. मात्र, वारंवार संपर्क करूनही रक्कम परत न मिळाल्याने वानखेडे व सहकारी रक्कम मागण्यासाठी घाटावर गेले होते. 

यावेळी आरोपींनी पोकलेन मशीन आडवी लावून वाहनांना अडवले. त्यानंतर एमएच ३२ एक्स ५७५७ क्रमांकाच्या थारमधून आलेल्या आरोपींनी तलवार व दांड्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात भरत दयानंद नागपाल यांचा मृत्यू झाला, तर पंकज वानखेडे व अनिल ठोंबरे जखमी झाले. याप्रकरणी वरोरा पोलिस स्टेशन येथे बीएनएस कलम १०३(१), १०९(१), १८९ (४), १९०, १९१(३), १९२, ३२४(५) व १२६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील झोरे, प्रफुल्ल उमाटे व अतुल पुरुषोत्तम मोटघरे या तिघांना अटक करण्यात आली असून अमोल कांबळे, अक्षय खडसे, सौरभ ठाकूर, पोकलेन - ऑपरेटर व अन्य आरोपींचा शोध सुरू - आहे.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा - पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी - भेट देऊन पाहणी केली. जिल्हा गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरीक्षक अमोल - काचोरे यांचे पथक तपासात सहभागी - आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी - संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याची माहिती पोलिस - निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी - दिली.

मृतक भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी

मृतक भरत दयानंद नागपाल पुलगावच्या नगरसेविका राज नागपाल यांचे सुपूत्र आहेत. २६ फेब्रुवारीला भरत यांनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला होता. शहरात लावलेले वाढदिवसाचे फलक अद्यापही झळकत असतानाच अवघ्या तीन दिवसांत त्यांची हत्या झाली.

घाटावरील एक पोकलेन जाळली

हल्ल्यानंतर आरोपींनी एमएच ३२ एएच १५९ क्रमांकाचे ब्रिझा, एमएच ३४ बीव्ही ७५८० व्हेन्यू, एमएच ४९ सीएल ३३६६ क्रेटा व एमएच ३२ एडब्ल्यू ७५७५ थार या चार वाहनांची तोडफोड केली, तसेच घाटावरील एक पोकलेन मशीन पेटवून दिल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
 

Web Title : रेती घाट पर पैसों के विवाद में हमला; एक की मौत, दो गंभीर।

Web Summary : रेती घाट पर पैसों के विवाद में भाजपा नेता की हत्या, दो घायल। तलवारों और लाठियों से हमला, वाहन तोड़े, मशीन जलाई। पुलिस ने तीन को गिरफ्तार किया, अन्य की तलाश जारी।

Web Title : Sand mine dispute turns deadly; one killed, two seriously injured.

Web Summary : A BJP leader was murdered, and two others were injured following a dispute over money at a sand mine. The incident involved a brutal attack with swords and sticks, vehicle vandalism, and the burning of machinery. Police have arrested three individuals and are searching for others.