प्राणघातक हल्ला करणाऱ्याला एक वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:36 AM2021-02-27T04:36:21+5:302021-02-27T04:36:21+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असलेले गोविंदा नक्षिणे हे आपल्या घरासमोर बसून होते. तेव्हा आरोपी मन्साराम रामाजी नाहाले हा ...

Assassination sentenced to one year in prison | प्राणघातक हल्ला करणाऱ्याला एक वर्ष कारावास

प्राणघातक हल्ला करणाऱ्याला एक वर्ष कारावास

Next

ब्रह्मपुरी तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असलेले गोविंदा नक्षिणे हे आपल्या घरासमोर बसून होते. तेव्हा आरोपी मन्साराम रामाजी नाहाले हा कुऱ्हाड घेऊन फिर्यादीच्या घरासमोरील अंगणात येऊन तू माझी बदनामी करतो, असे म्हणत कुऱ्हाडीने हल्ला केला. या प्रकरणात फिर्यादीने ६ मार्च २०१६ ला ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीच्या आनुषंगाने ब्रह्मपुरी पोलिसांनी तपास करून ब्रह्मपुरी न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.

यामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश मा. गो. मोरे यांनी २३ फेब्रुवारी २०२१ला यामध्ये आरोपीला एक वर्ष साध्या कारावसाची शिक्षा व पाच हजार द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.

आरोपीला एक वर्ष कारागृहात पाठविण्याऐवजी एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्यात आले. दंडाची रक्कम फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात आली.

अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता देवेंद्र ई. बारस्कर यांनी बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस विभागाचे सुदेश कुमरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Assassination sentenced to one year in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.