शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर्सचे थकीत मानधन मंजूर

By admin | Updated: November 18, 2016 01:07 IST

जिल्ह्यातील पाच तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे एप्रिल महिन्यांपासून मानधन थकीत आहे.

आयटकचे आंदोलन : नाविण्यपूर्ण योजनेतून छत्री-रेनकोट मिळणार चंद्रपूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांचे एप्रिल महिन्यांपासून मानधन थकीत आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेने (आयटक) गुरूवारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आशा वर्कर्सचे थकीत मानधन अदा करण्यास मान्यता दिली. याशिवाय संघटनेच्या मागणीनुसार, या कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करणे सोईस्कर व्हावे, यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून छत्री व रेनकोट देण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला.आयटकच्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व आयटकचे राज्य सचिव दिलीप उटाणे यांनी केले. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये ब्रह्मपुरी, चिमूर, नागभीड, सावली व गोंडपिपरी या तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांचे एप्रिल महिन्यांपासून मानधन थकीत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. चर्चेदरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून थकीत मानधन देण्याचा निर्णय घेतला. आशा वर्कर्स पावसाळ्यात शासनाच्या योजना राबवित असतात. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. शिष्टमंडळाने पावसाळ्यात त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची मागणी चर्चेमध्ये केली. त्यांना रेनकोट व छत्री देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून छत्री व रेनकोट देण्यास मान्यता दिली. जिल्हा नियोजन समितीकडे नाविण्यपूर्ण योजनेतून छत्री व रेनकोट उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. चर्चेदरम्यान सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.आंदोलनामध्ये आयटकचे राज्य उपाध्यक्ष व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हा उपाध्यष संतोष दास,भद्रावतीचे नगरसेवक राजू गैनवार, जिल्हा संघटक श्रीधर वाढई, शीतल प्रधान, छाया बोदेले, उषा नंदनवार, ज्योती तामगाडगे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी) यवतमाळ औद्योगिक न्यायालयानुसार नियमित करायवतमाळ येथील औद्योगिक न्यायालयाने २०१२पासून राज्यातील सर्व आशा वर्कर्स व गटप्रवर्गकांना नियमित सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ व वेतन देण्याचे निर्देश दिले आहेत. शिष्टमंडळाने जिल्ह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना यवतमाळ औद्योगिक न्यायालयाचा आदेश लागू करण्याची मागणी करण्यात आली.