शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीला एकाच चितेवर अग्नी देऊन अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 1, 2015 01:31 IST

घरून बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी घरी धडकताच पत्नीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली.

लग्नाच्या वाढदिवशी अंत्यसंस्कार : घातपात असल्याची वडिलाची तक्रारवरोरा : घरून बेपत्ता झालेल्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी घरी धडकताच पत्नीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. मृत पती-पत्नीला रविवारी एकाच चितेवर ठेवून अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.वरोरा शहरानजीकच्या चिनोरा गावातील बांधकाम साहित्य व्यावसायिक रवींद्र बळीराम डोंगरकर आठ दिवसांपूर्वी घरून निघून गेले. २६ मे रोजी त्याचा पडोली रेल्वे मार्गानजीक मृत्यू झाला. अनोळखी मृतदेह असल्याने पडोली पोलिसांनी दफन केले. ३० मे रोजी रवींद्रच्या घरच्यांनी त्याच्या कपड्यावरुन मृतदेह रवींद्रचा असल्याचे ओळखले. मृतदेह घरी नेण्याचे सोपस्कार पूर्ण करीत असल्याची वार्ता घरी त्याची पत्नी रोशनी हिच्या कानाी पडताच रोशनीने स्वत:वर रॉकेल टाकून जाळून घेतले. त्यात ती जागीच मृत पावली. पती-पत्नीवर चिनोरा येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर मृत रवींद्र याला भाऊ अशोक याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी मोठा आप्त परिवार शोकाकूल अवस्थेत उपस्थित होता. (तालुका प्रतिनिधी)लग्नाचा तिसरा वाढदिवसदोन वर्षापूर्वी रवींद्र व रोशनीचा ३० मे रोजी विवाह झाला होता. रवींद्रचा मृत्यू २६ मे रोजी तर रोशनीचा ३० मे रोजी झाला. दोघांवरही लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग डोंगरकर कुटुंबीयांवर आला.मुलाचा घातपाताने मृत्यू, पित्याची पोलिसांत तक्रारघातपात घडवून माझ्या मुलाला ठार मारल्याची तक्रार मृत रवींद्रचे पिता बळीराम डोंगरकर यांनी पोलिसात केली आहे. या तक्रारीत संशय व्यक्त केलेल्या व्यक्तीचे नाव मात्र कळू शकले नाही.पोलिसांना शवविच्छेदन अंतिम अहवालाची प्रतीक्षामृताच्या पित्याची पोलिसांना तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसांनी काही व्यक्तींचे बयाने नोंदविले असल्याचे समजते. आता मृत रवींद्र्रच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यावर या प्रकरणातील तपासणी दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.