शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घूसमधील अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव

By admin | Updated: June 19, 2015 01:48 IST

येथील ग्रामपंचायतीच्यावतीने घुग्घूस शहरात बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली खरी, ....

नागरिकांचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही ग्रामपंचायतीचा ठेंगाघुग्घूस: येथील ग्रामपंचायतीच्यावतीने घुग्घूस शहरात बुधवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली खरी, परंतु या मोहिमेदरम्यान दुजाभाव करण्यात आल्याच्या प्रकाराने ही मोहीम वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील पथकाने बुधवारी दुपारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरूवात केली. त्यात अनेकांचे पक्के ओटे तोडण्यात आले. दुकानांसमोर अतिक्रमणात बांधलेले शेडही हटविण्यात आले. मात्र बाजारातील मांस विक्रीच्या दुकानाकडे या पथकाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांंमध्ये रोष व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविताना काही ठिकाणी या पथकातील सदस्यांशी अतिक्रमणधारकांचा चांगलाच वादही झाला. मुळात ही मोहीम मंगळवारी राबविण्यात येणार होती. मात्र पोलीस संरक्षण न मिळाल्याने ती बुधवारी राबविण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान, बाजारातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना एका मांस विक्रीच्या दुकानाजवळी अन्य दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र मांस विक्रीचे दुकानही अतिक्रमणात असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही दुकानदार उपस्थित नसताना त्यांच्या दुकानातील आलमाऱ्या पाडण्यात आल्या. ही अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अगोदर संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी सर्वच अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र मर्जीतील दुकानदारांना पुन्हा मुदत देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर पक्के बांधकाम करण्यात आले. त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, संवर्ग अधिकाऱ्यांना दिले होते. चौकशीत अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत अतिक्रमण हटविण्याचे आदेश घुग्घूस ग्रामपंचायतीला दिले होते. दिवसानंतरही कार्यवाही झाली नाही. ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर पक्के बांधकाम करणाऱ्या त्याच इसमाचे बाजारात मांस विक्रीचे दुकानही आहे. त्याला अतिक्रमण मोहिमेतून सुट देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)