शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीवजा घरात होम क्वारंटाईनची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:01 IST

धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

ठळक मुद्देअडकलेल्या मजुरांचा सवाल : मजूर म्हणतात’ घरी आलोत परंतु कोंडमारा भोगतोय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाची खडगी भरण्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेलेले जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार स्थलांतरीत मजूर सोमवारपर्यंत परत आले आणि क्वारंटाईन झाले. मात्र, झोपडीवजा घरात कसे व किती अंतर ठेवणार, मजुरीची तर काहीच शाश्वती नाही, संकटे झेलत घरी येऊनही कोंडमारा भोगत आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातून चंद्रपुरात अडकलेले परप्रांतीय मजूर प्रशासनाला विचारत आहेत ‘घरचे सर्व चिंतेत आहेत परतीसाठी आमचा नंबर केव्हा लावणार...’ सरकारने मजुरांना रेल्वेने पाठविणे सुरू केले. पण सारेच मजूर अस्वस्थ आहेत. ‘लोकमत’ने विविध ठिकाणच्या निवारा केंद्रांची पाहणी केल्यानंतर कुटुंबाचीच चिंताच मजुरांना छेडत असल्याचे तणावग्रस्त चेहऱ्यावरून बुधवारी दिसून आले.धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकल्याने मजूर स्वत:च्या घरी परत आले. विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना स्वगावी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे. घरी परतलेले मजूर आता क्वारंटाईनमध्ये आहेत. मूल येथील होम क्वारंटाईनमधील व्यक्तींच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता म्हणाले, चंद्रमोळी तीन खोल्यांच्या झोपडीत सात सदस्य राहतात. काम केले तरच पोट भरते. घरात पैसाअडका नाही. ‘आरोग्य की पोट’ याबाबत कशाचे अंतर पाळायचे हेच समजत नाही.’ नागभीड तालुक्यातील विंथूर, ठवरे पारडी, पाणलोडी, नांदेड येथील मजुरांनाही रोजीरोटीचाच प्रश्न भेडसावत आहे.मदतीऐवजी घराचीच ओढचंद्रपूर शहराच्या महाकाली वार्डातील मनपाच्या महाकाली कन्या स्कूल विद्यालयातील निवारा केंद्रात मध्य प्रदेशातील २३ व भंडारा जिल्ह्यातील एक असे एकूण २४ मजूर अडकले आहेत. इमारती बांधकामावर काम करणारे हे मजूर घरी जाण्याची प्रतीक्षा करत आहेत. याशिवाय घुटकाळा वार्डातील जाकीर हुसेन उर्दू विद्यालयात तेलंगणाचे १६ व गोंदियाचे ७ असे २३ मजूर अडकून आहेत. या केंद्रांना भेटी दिल्या असता मनपा व जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी तैनात असल्याचे दिसून आले. मदतीऐवजी घराकडे कधी पोहोचवणार, याचीच सर्वांना आतुरता लागल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.क्वारंटाईन पूर्ण झालेल्यांना प्रमाणपत्राची प्रतीक्षालॉकडाऊन कालावधीत बाहेरून आलेल्या व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार क्वारंटाईन झाले. अनेकांचा क्वारंटाईन पूर्ण झाला. पण, अद्याप प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना घरातच अडकून राहावे लागत आहे.सुविधा पुरविण्यास दमछाकजिवती : परप्रांतात गेलेल्या तालुक्यातील मजुरांच्या परतीचा ओघ सुरूच असल्याने सुविधा पुरविण्यास प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे घरीच विलगीकरण करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी ग्रामपंचायतींना दिले. तालुक्यातून १ हजार ९०० मजूर ऊस, मिरची तोडणी व कापूस वेचणीकरिता परराज्यात गेले होते. उन्हाची तीव्रता वाढली. सर्वांना सोयी-सुविधा पुरविणेही कठिण होत आहे. गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्यास ग्रामपंचायत दोन हजारांचा दंड ठोठावणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या