शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक शहर गडचांदूरला तालुका घोषित करा

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील गडचांदूर या शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. सद्यास्थितीत ३५ हजार लोकसंख्येचे शहर आहे. बहुतांश आर्थिक तसेत शासकीय व्यवहार येथेच होत असतानाही तालुका घोषित न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. आता या मागणीसाठी नागरिक विधानसभेवर धडकणार आहे.राजुरा, कोरपना, जिवती या तीन तालुक्याचे केंद्रस्थळ व मोठी बाजारपेठ गडचांदूर येथे आहे. गडचांदूरला तहसीलचा दर्जा देवून प्रशासकीय कार्यालय सुरू करावे व इतर मागणीसाठी २१ डिसेंबर २०११ , २१ डिसेंबर २०१२ व १८ डिसेंबर २०१३ ला तालुका संघर्ष समितीतर्फे नागपूर अधिवेशनप्रसंगी मोर्चा काढला होता. मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता विधानसभेवर हिवाळी अधिवेशनप्रसंगी १९ डिसेंबरला मोर्चा तसेच धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर शहराला नुकताच नगर परिषदेचा दर्जा शासनाने दिला आहे. राजुरा- कोरपना- जिवती या तिन्ही तालुक्यापासून गडचांदूर शहर २५ किमी अंतरावर आहे. गडचांदूर हे मुख्य केंद्र व मोठी बाजारपेठ तसेच औद्योगिक दृष्टया गजबलेले शहर असल्याने शासनाला येथून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परिसरातून शासनाला प्रत्येक वर्षी सुमारे ५० कोटींचा महसूल मिळत असल्याची माहिती आहे.गडचांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत २४ ग्रामपंचायत असून ५२ गावांचा समावेश आहे. या सर्व गावातील नागरिकांना गडचांदूर हे शहर सोयीचे आहे. येथे सार्वजनिक बांधकाम विभागचे उपविभागीय कार्यालय विश्रामगृह, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यालय, नगर परिषद, पोलीस स्टेशन, ग्राम न्यायालय नायब तहसीलदाराचे अस्थायी भेट कार्यालय असे अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित आहे . याशिवाय शाळा, महाविद्यालये, वसतिगृह आहे. परंतु शासनाने या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. जिवती तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर केले आहे. छोट्या खोलीत कार्यालय सुरू आहे. राजुरा येथील दुय्यम निबंधकाकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गडचांदूर येथे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालय गडचांदूर येथे सुरू करण्याची मागणी होत असतानाही कार्यालय सुरू केले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.(वार्ताहर)