शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल महागाईच्या विरोधात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

शिवसेनेचे जिल्हाभरात आंदोलन : कृषी कायद्यांचाही निषेध चंद्रपूर : केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलची सतत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे शिवसेनेने जिल्हाभरात ...

शिवसेनेचे जिल्हाभरात आंदोलन : कृषी कायद्यांचाही निषेध

चंद्रपूर : केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलची सतत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे शिवसेनेने जिल्हाभरात आंदोलन केले. चंद्रपूर येथील गांधी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी रावसाहेब दानणे यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्त्व्याचा निषेध म्हणून त्यांचा पुतळा तुडविण्यात आला.

पेट्रोल डिजेलच्या दरात सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या वाढीविरोधात शिवसेनेतर्फे संताप व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्रसरकारने बहुमताच्या जोरावर कृषी कायदा समंत केला. त्याविरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र हे आंदोलन पाकिस्तान तसेच चिनचे षडयंत्र असल्याची टिका भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केली. त्या वक्तव्याच्याही निषेध करुन त्याचा पुतळा तुडवून त्यांना मंत्रीपदावरुन निष्कासित करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी केली. यावेळी बल्लारपुर विधानसभा उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव, जि. प. माजी उपाध्यक्ष संदीप करपे, चंद्रपूर शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे, महिला आघाडीचे माजी जिल्हा प्रमुख कुसुम उदार, वर्षा कोठेकर, विद्या ठाकरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार, मूल तालुका प्रमूख नितीन येरोजवार, चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष नरुले, बल्लारपुर तालुका प्रमुख प्रकाश पाठक, राजुरा शिवसेना बबन उरकुडे, राहुल विरुटकर, सुरज नाय्यर, स्वप्निल काशीकर, अशोक चिलखरे, श्रीकांत करटभाजने, सोनू ठाकुर, अर्जुन धुन्ना, अक्षय अभिरवार, हर्षल कान्नपेल्लीवार यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थिती होते.

बॉक्स

भद्रावतीत शिवसेनेतर्फे आंदोलन

भद्रावती : पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात भद्रावती येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम, तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे, शहर प्रमुख संदीप मेश्राम, शहर प्रमुख नरेंद्र पठाण, तालुका संघटक नरेश काळे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, पप्पू सारवान, राजू सारंगधर, महिला शहर प्रमुख माया नारळे, संगीता डाहुले,अल्का वाटेकर, आगलावे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

बॉक्स

सिंदेवाही शिवसेनेचा निषेध

सिंदेवाही : राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी चौक बसस्थानक परिसरात शिवसेनेच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा तसेच दिल्ली येथील शेतकऱ्यांचा आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सचिन चिंतलवार, देवा मंडलवार, विशाल लोखंडे, पंकज नन्नेवार, सगळाम यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.