शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
3
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
4
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
5
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
6
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
8
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
9
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
10
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
11
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
12
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
13
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
14
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
15
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
16
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
17
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
18
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
19
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
20
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

‘त्या’ देवदूताने त्यांना मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:01 IST

आता कोरोना म्हटले तरी अंगावर शहारे येतात. कोरोनावर मात करण्यासाठी गडगंज संपत्ती असली तरी ती वेळेवर कामी येत नाही. अशी अनेक उदाहरणे दिवसागणिक पुढे येत आहे. याचा प्रत्यय लक्की सलुजा यांना हैदराबाद येथे आला. कितीही पैसा मोजायला तयार असताना तो उपयोगात येत नव्हता. मात्र एका फोनपुढे पैसाही थिटा पडला, असेही सलुजा यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देचंद्रपुरातील कोरोनाग्रस्त कुटुंबाचा हैदराबाद येथील थरारक अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  जीवन आणि मृत्यूमधील अंतर कमी होताना शेवटचा प्रयत्न म्हणून हादरलेल्या एका कुटुंबप्रमुखाने वैचारिक व राजकीय मतभेद बाजूला सारून माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांना एक फोन केला. मुनगंटीवारांनीही पक्षभेद विसरून क्षणात मदत करीत त्यांना साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. हा थरारक अनुभव चंद्रपुरातील प्रतिष्ठित नागरिक व काँग्रेस विचारधारेचे लक्की सलुजा यांना हैदराबाद येथे आला. पक्षभेद व वैचारिक मतभेद विसरून मदतीला धावून जाणाऱ्या या वृत्तीमुळे सुधीर मुनगंटीवारांनी आपल्या मनात कायमचे घर केल्याची भावना लक्की सलुजा यांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली. यावेळी ते भावुक झाले होते.आता कोरोना म्हटले तरी अंगावर शहारे येतात. कोरोनावर मात करण्यासाठी गडगंज संपत्ती असली तरी ती वेळेवर कामी येत नाही. अशी अनेक उदाहरणे दिवसागणिक पुढे येत आहे. याचा प्रत्यय लक्की सलुजा यांना हैदराबाद येथे आला. कितीही पैसा मोजायला तयार असताना तो उपयोगात येत नव्हता. मात्र एका फोनपुढे पैसाही थिटा पडला, असेही सलुजा यांचे म्हणणे आहे.सलुजा यांची बहीण चंद्रपुरात आली होती. यामुळे त्यांना आपल्या घरात कोरोनाचा शिरकाव होऊ शकतो असा संशय आला. सहपरिवार हैदराबाद येथील फ्लॅटवर जाऊन राहू म्हणून १८ एप्रिल रोजी लक्की सलुजा हे पत्नी व मुलीसह हैदराबादला निघाले. हा संशय खरा निघाला. २२ एप्रिल रोजी मुलगीही पॉझिटिव्ह निघाली.

घरातील तिघेही पॉझिटिव्ह निघाल्याने सलुजा चिंताग्रस्त झाले. २५ एप्रिलला त्यांना वाटले की आता रुग्णालयात खोली मिळणे आवश्यक आहे. यानंतर रुग्णालयाच्या चकरा सुरू झाल्या. ५० हजार रुपये भाडे असेल तरी द्यायची तयारी होती. पैसा हा मुद्दाच नव्हता. मात्र एकही खोली मिळत नव्हती. धन-संपत्ती यावेळी थिटी पडल्याचे सलुजा यांनी जाणवत होते.२६ ते २९ पर्यंत हैदराबाद येथील पंचतारांकित हॉटेलातही सलुजा यांना खोली मिळाली नाही. स्वत:च कोरोनाचा रुग्ण असल्यामुळे वाहनात चालकही ठेवू शकत नव्हते. रुग्णालयात खोली मिळणे तर दूरच वाहनतळावर वाहन ठेवायला तासभराचा वेळ लागायचा. २९ एप्रिलला मुलीचा एचआरसीटी अहवाल प्राप्त होताच डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काहीही सुचत नव्हते. पैसा आहे. गाडी आहे. स्टाफ आहे. सर्वकाही सुविधा विकत घेऊ शकण्याची कुवत आहे. मात्र परिस्थितीपुढे हतबल होण्याशिवाय काहीही करू शकत नसल्याचे त्यांना वाटत होते. चंद्रपुरातून रेमडेसिविर इंजेक्शनही बोलाविले होते. ६० किलो वजनाचे ऑक्सिजन सिलिंंडरही बोलावून ठेवले होते. मात्र याचा अनुभव नसल्याने काहीच करू शकत नव्हतो. रुग्णालय व डॉक्टरी उपचाराशिवाय पर्याय नव्हता. याबाबत आपबिती सांगताना सलुजा म्हणाले,  सुरुवातीला परिस्थितीशी भांडलो. मात्र नंतर हादरलो होतो. पुढचे चार दिवस असेच भटकावे लागले तर खोली नाही तर आयसीयु रुग्णालय शोधावे लागेल. ही स्थिती होती. डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले. जीवन आणि मृत्यू या दोन गोष्टींमधील अंतर कमी होताना दिसत होते. सर्व पर्याय संपले होते. हातातून वेळ जात होता. आपण चंद्रपूरचे आणि हैदराबादला कोण मदतीला धावून येईल, तेव्हा एकच नाव डोळ्यापुढे आले. ते म्हणजे सुधीर मुनगंटीवार. हीच व्यक्ती आपल्याला या क्षणी मदत करू शकेल. या आशेने पक्षभेद, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून मुनगंटीवार यांना एक फोन करून सर्व आपबिती सांगितली. यानंतर त्यांनी क्षणात जी मदत केली. त्यामुळे जीवन-मृत्यूतील अंतर वाढले. मुनगंटीवार यांनी त्याच रात्री रुग्णालय मिळवून दिले. त्यानंतर सारे काही सुरळीत झाले. आजही आम्ही तिघेही त्या रुग्णालयातच आहोत. गडगंज संपत्ती असली तरी ही मदत अमूल्य आहे. कुणाच्याही वाट्याला येऊ नये असा हा विचित्र अनुभव माझ्यासाठी पहिल्यांदाच होता. या संकटसमयी एखाद्या देवदूताप्रमाणे धावून केलेल्या मदतीमुळे सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनाच्या देव्हाऱ्यात स्थान पक्के केले       आहे. 

रुग्णवाहिकेतून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्नसुधीर मुनगंटीवार यांनी जी मदत केली, त्याची भरपाई करूच शकत नाही. आम्ही कुटुंबीयांनी तेव्हाच विचार केला. आपणही समाजाचे देणे लागतो. रुग्णालयातूनच एक रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेतला आणि लगेच सर्व सोपस्कार पूर्ण केले. वाढत्या मागणीमुळे नवीन रुग्णवाहिका लगेच मिळत नव्हती. मात्र हैदराबाद येथे रुग्णवाहिकेचे काम करणारा  महाराष्ट्रीयन होता. त्यात रुग्णवाहिकेवर सुधीर मुनगंटीवार यांचे छायाचित्र लावायचे असल्याचे सांगितल्याने त्यानेही अत्यंत कमी वेळात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. ही रुग्णवाहिका बल्लारपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या साक्षीने रुग्णसेवेत रूजू झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार