शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन् विद्यार्थी दररोज आठ वाजेपर्यंत ताटकळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह कोरपना तालुक्यातील कोडसी, हेटी, तुकडोजी नगर येथील शेकडो विद्यार्थी नियमित प्रवास करतात.

ठळक मुद्देपालकांमध्ये नाराजी : रात्री करावा लागतो प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : कोरपना येथून वणी शहराकडे जाण्यासाठी सांयकाळी ५.३०, ६.०० व ६.३० वाजताची बस उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोजच रात्री उशिरापर्यंत ताटकळत राहावे लागते आहे. यामुळे शेकडो पासधारक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने मंगळवारी वणी आगार प्रमुखाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त केला.कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असून शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. वणी तालुक्यातील कुरई, ढाकोरी, बोरी,गोवारी पारडी, निंबाळा, मूर्ती, देऊरवाडा, तेजापूर, पाथरीसह कोरपना तालुक्यातील कोडसी, हेटी, तुकडोजी नगर येथील शेकडो विद्यार्थी नियमित प्रवास करतात. मात्र दररोजच वणी मार्गावर निर्धारित वेळेत उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त झाले आहेत. कोरपना ते वणी दरम्यान ही मोजक्याच बसेस चालत असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. याबाबत अनेकदा वणी व राजुरा आगाराचे लक्ष वेधूनही आगार व्यवस्थापकांनी लक्ष दिले नाही, असा आरोप पालकांनी केला. प्रवाशांची संख्या मोठी असतानाही कोरपना ते वणी दरम्यान बसेस कमी सोडण्याचा प्रकार सुरूच आहे. बसेस सोडल्या जात नसल्याने याचा फटका विद्यार्थी, महिला, वयोवृध्द मंडळींना बसत आहे. निंबाळा, गोवारी पारडी, मूर्ती, ही गावे मुख्य मार्गापासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने रात्री विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याची मागणी गणेश गोडे, बाळू बोडखे, प्रमोद रामगीरवार, अतुल सिडाम, बंडू भगत, संतोष देरकर, शारिक सय्यद, राकेश ठेपाले, करण काकडे, रूपाली पिदुरकर, नितिषा ढवस, कैलास उइके, योगिता टेकाम, भूषण मोहितकर, साक्षी झाडे आदींनी केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी