शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील प्राचीन ठेवा दुर्लक्षित

By admin | Updated: March 20, 2015 00:42 IST

प्राचिन व ऐतिहासीक गाव अशी ओळख असलेल्या पवनी नगरात व अवतीभवती अनेक प्राचिन वारसा लाभलेले स्थळ आहेत.

अशोक पारधी  पवनीप्राचिन व ऐतिहासीक गाव अशी ओळख असलेल्या पवनी नगरात व अवतीभवती अनेक प्राचिन वारसा लाभलेले स्थळ आहेत. त्यापैकी परकोट व टेकड्यांना भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षीत केलेले आहे. परंतु दिवाणघाट हे वैनगंगा नदीवरील नगराच्या उत्तरेला असलेले वैभव संपन्न घाट राज्य शासनाच्या व पालिका प्रशानाच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याचे मार्गावर आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून डागडुजी केली नाही तर ते घाट इतिहास जमा होईल, असे चित्र दिसत आहे.वैनगंगा नदीकिनाऱ्यावर मस्तानशाँ दरगाह, हत्तीगोटा, निलकंठेश्वर मंदीर, दिवाणघाट, पाणखिडकी, ताराबाईचा घाट व वैजेश्वर घाट असे महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत. भंडाऱ्याकडून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांचे लक्ष त्याकडे वेधले जाते. परंतू आतापर्यंत वैजेश्वरघाट व मंदीर सोडले तर उर्वरित स्थळांकडे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. पर्यटनासाठी आलेला निधी व आमदार खासदारांचा स्थानिक विकास निधी खर्च करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वैजेश्वर मंदीर व घाट निवडलेले आहे. परंतु ढासळत चाललेल्या दिवाण घाटाकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. लोकसंख्या व विधानसभा निवडणुकीपूर्वी दिवाणघाटाचे पुर्नबांधणीसाठी पर्यटन विकासांतर्गत फार मोठ्या निधीची तरतुद करण्यात आल्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी सांगत होते. परंतू मार्च अखेरपर्यंत कोणताही निधी प्रशासनाकडे पोहोचलेला नाही.दिवाणघाटावर महिला व पुरूष वेगवेगट्या घाटांवर उतरून स्नान करू शकतील, अशी रचना करण्यात आलेली होती. २५ वर्षापूर्वी ते शक्य होत होते. परंतू गत २०-२५ वर्षात दिवाण घाटाचे बांधकाम ढासळू लागले आहे. एक एक घाट निकामी होत आहे. परंतू प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पर्यटन विकासांतर्गत निधीची तरतूद करून दिवाण घाटाची पुननिर्मिती करावी, अशी पवनीकर जनतेची मागणी आहे.