शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व सांडपाण्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 23, 2015 01:15 IST

शहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, ...

गोंडपिंपरी शहर : नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ? वेदांत मेहरकुळे गोंडपिंपरीशहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट या अतिसंवेदनशील बाबींसह पथदिवे व रस्त्यांची प्रमुख समस्या येथील नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक पातळीवर इंदिरानगर या वॉर्डाचे नगरपंचायत घोषणेनंतर दोन प्रभागात विभाजन झाले असून नव्याने पाडण्यात आलेल्या प्रभागांना अनुक्रमे ४ व ५ असे क्रमांक देण्यात आले आहे. इंदिरानगर स्थित नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच गंभीर आहे. शहरातील नळयोजना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात वारंवार अपयशी ठरत असून येथील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर जावे लागते. तसेच सदर परिसरात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी विल्हेवाट या प्रमुख बाबींकडे आजवर ग्रामपंचायतीने अक्ष्यम्य दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते. येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील सांडपाणी नाल्यांची सफाई न केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरुन याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती दिली. तसेच प्रभागामधील अंतर्गत रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले खडीकरण रखडले असून ठिकठिकाणी खड्डे व मोठे दगड उघडी पडल्याचे दिसून येते. या सोबत या परिसरात काही ठिकाणचे पथदिवे बंदावस्थेत असल्याने रात्री नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.तसेच प्रभागात सार्वजनिक हातपंप तर आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हातपंप मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्यामुळे नागरिकांना दूषित व फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना या प्रभागात राबविण्यात आल्या. मात्र भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे विकास कामांनाही गालबोट लागले आहे. आगामी निवडणुक तोंडावर असताना प्रभाग प्रतिनिधीत्व स्वीकारु पाहणाऱ्यांनी आजवर झालेल्या या इंदिरानगर प्रभागावरील अन्यायाबाबत काय लढा दिला, असा सवाल येथील जनतेकडून आज घडीला विचारल्या जात आहे. केवळ जनसेवेचे ढोंग रचून येथील भोळ्या भाबळ्या जनतेच्या भावनांशी खेळ करीत निवडून येणाऱ्या प्रभाग प्रतिनिधींनी आजवर येथील नागरिकांचा भ्रमनिरास करण्यापलिकडे काहीच केले नाही. या प्रभागांची समस्या सोडविण्याचे तगडे आवाहन नगरपंचायतीसमोर असून नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेवरच सर्व काही अवलंबून आहे.