शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त जनावरांवर वेळीच उपचारासाठी दिली रुग्णवाहिका भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:30 IST

चंद्रपूर : जनावरांचा क‌ळवळा अनेकांना असला, तरी त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. चंद्रपुरात प्यार फाउंडेशन मात्र या मुक्या ...

चंद्रपूर : जनावरांचा क‌ळवळा अनेकांना असला, तरी त्यांच्यासाठी धावून जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. चंद्रपुरात प्यार फाउंडेशन मात्र या मुक्या प्राण्यांसाठी सातत्याने झटत आहे. अनेक अडचणींवर मात करून त्यांची ही भूतदया सुरू आहे. त्यांना मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी चक्क रुग्णवाहिकाच भेट दिली. पुगलिया यांची भूतदया पाहून प्यार फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी भावुक झाले होते.

प्यार फाउंडेशनद्वारे मोकाट जनावरांचे संरक्षण, देखभालीसह त्यांच्यावर औषधोपचार करतात. सध्या जखमी पशुपक्ष्यांवर उपचार सुरू आहे. अलीकडे उत्तर प्रदेशात जाऊन एका कुत्र्याला जीवदान दिले होते. ही बाब हेरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी अचानक संस्थेेला भेट दिली. संस्थेचे कार्य बघून ते भारावले. त्याचक्षणी त्यांनी मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने रुग्णवाहिका भेट देण्याचे जाहीर केले. केवळ आश्वासन देऊन ते शांत राहिले नाही तर त्यांनी रुग्णवाहिका आज आपल्या समक्ष काँग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया यांच्या हस्ते प्यार फाउंडेशनच्या सुपूर्द केली. या रुग्णवाहिकेमुळे अपघातग्रस्त जनावरांना वेळीच उपचार करणे सोयीचे होणार आहे. यावेळी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर ग्रामीणचे अध्यक्ष गजानन गावंडे, शहराध्यक्ष देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव ॲड. अविनाश ठावरी, जिल्हा महासचिव, नगरसेवक अशोक नागापुरे, इंटक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, मजदूर काँग्रेसचे वसंतराव मांढरे, तारासिंह कलशी, रामदास वाग्दरकर, क्रिष्णा नायर, वीरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, राजेश शुल्का, गजानन दिवसे, अनिल तुगीडवार, आशिष मेहता, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, अनंता हुड, सुधाकरसिंह गौर, बाबुलाल करुणाकर, अजय महाडोळे, दुर्गेश चौबे आदींची उपस्थिती होती.