शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीविरुद्ध आमरण उपोषण सुरू

By admin | Updated: September 10, 2014 23:34 IST

महानिर्मितीच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लोखंड चोरी आणि कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे,

चंद्रपूर : महानिर्मितीच्या अखत्यारीत असलेल्या चंद्रपूर वीज केंद्रातील लोखंड चोरी आणि कंत्राट मिळविण्यासाठी खोटे दस्ताऐवज सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश प्रतिनिधी सुनिल दहेगावकर यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. चार महिन्यांपूर्वी लोखंड चोरी प्रकरणात पोलिसांनी तिरुपती कन्स्ट्रक्शनविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतरही चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. याआधी पाईप चोरी प्रकरणात भावना कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर वीज केंद्राने या कंपनीला काळ्यात यादीत टाकण्याची कारवाई केली होती. कोळसा वाहतुकीमध्ये हेराफेरी केल्याप्रकरणी कुक्कू साहनी यांच्या कंपनीलासुद्धा काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र तिरुपती कन्स्ट्रक्शनविरुद्ध वीज केंद्राने अशी कोणतीही कारवाई केली नाही. यामागे तिरुपती कन्स्ट्रक्शन कंपनी आणि वीज केंद्र प्रशासनाचे हितसंबंध जुळले असल्याचा आरोप दहेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला. हे प्रकरण ताजे असतानाच एका कामाचे कंत्राट मिळविण्यासाठी तिरुपती कन्स्ट्रक्शनने खोटे दस्ताऐवज सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतरही वीज केंद्राने प्रशासकीय कारवाई करण्याचे टाळले.दोन्ही प्रकरणे गंभीर स्वरुपाची असताना महानिर्मिती आणि चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाने तिरुपती कन्स्ट्रक्शनला लाखो रुपये किमतीचे दुसरे कंत्राट दिले. लोखंड चोरी आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी तिरुपती कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकून सुरू असलेली कामे तत्काळ बंद करण्यात यावी, यासाठी दहेगावकर यांनी महानिर्मिती आणि वीज केंद्र प्रशासनाला आठवभराचा अल्टिमेटम दिला होता. मात्र आठवडाभरात कोणतीही कारवाई न झाल्याने मंगळवारपासून दहेगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव झाडे, राकाँच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, गजानन पाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोरे, रायुकाँचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वडूळकर, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळकृष्ण भगत, प्रदीप रत्नपारखी, महेंद्र मेश्राम, रवी भोयर, विशाल चहारे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)