शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या सायंकाळी हवा आधार

By admin | Updated: September 30, 2014 23:33 IST

आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरआयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी काही वृद्धांच्या नशीबी हाल, अपेष्टा तसेच अपमानित जीवन जगण्याची वेळ येते. तेव्हा मात्र जीवनाचा प्र्रत्येक क्षण आठवतो. आयुष्यात जे कमावले त्याची उतारवयात काहीच किमत नसल्याचे त्यांना जाणवते. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही कुणीच नसते. वृद्धापकाळात आधार मिळावा यासाठी प्रत्येकांना आशा आहे. मात्र त्यांच्या आशेवर अनेकवेळा पाणी फेरल्या जाते. आता मात्र येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या समवयस्कांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. एवढेच नाही तर, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही सहभाग घेऊन स्वत:चा ‘आधार’ शोधण्यासाठी धडपड सुरु केली आहे.ज्येष्ठांना समाधानाने दोन शब्द बोलता यावे, त्यांचा विळंगुळा व्हावा यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने काम सुरु केले आहे. या संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे हे आहे. विशेष म्हणजे, राज्यात या संघाचे काम वाखान्याजोगे असून शहरात तब्बल ५ हजारावर सदस्यांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्यांवर येथे विचारमंथन केले जाते. अनेकवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. एवढेच नाही तर, येथील ज्येष्ठ नागरिक संघाने सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही आपले योगदान देत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि श्रमशक्तीचा वापर भावी पिढीला आजही प्रेरणादायी ठरत आहे. वृद्धांच्या अनेक समस्या आहे मात्र त्या सोडविण्यासाठी पाहिजे तसे लक्ष देण्यासाठी शासन, समाज तसेच कुटुंबाकडेही वेळ नसल्याचे सध्याचे चित्र आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांपैकी ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. यातील बहुतांश ज्येष्ठांना सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षितता नाही. ४० टक्के ज्येष्ठांना घरात मानसिक त्रास दिला जातो. तर, १७ टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. परिणामी काहींना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. शासनातर्फे विविध योजनेंतर्गत मदत दिली जात असली तरी ती त्यांना पोहचतेच असे नाही. त्यामुळे ठोस धोरण आखून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.