शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा योजना आठ वर्षानंतरही अपूर्णच

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

प्रशासनाची लालफीतशाही आणि लोकांची उदासिनता या चक्रव्युहात सापडलेल्या नागभीड तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना ...

प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता : कोट्यवधींचा खर्च व्यर्थघनश्याम नवघडे  नागभीड प्रशासनाची लालफीतशाही आणि लोकांची उदासिनता या चक्रव्युहात सापडलेल्या नागभीड तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना गेल्या सात-आठ वर्षानंतरही अपूर्णच आहेत. या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असला तरी या योजना अद्याप स्वत:चीच तहान भागवू शकल्या नाही, हे वास्तव आहे.नागभीड तालुक्यात मोहाळी, ब्राम्हणी, कोर्धा, मिंथूर, नवेगाव पांडव, चिंधी माल, गिरगाव, चिंधी चक, जनकापूर, मिंडाळा, कोटगाव आदी अनेक गावात या पाणी पूरवठा योजनांना शासनाकडून मंजुरी देण्यात आली. सर्वाना शुध्द आणि मुबलक पाणी मिळावे, कोणीही पाण्यापासून वंचित राहू नये, हा यामागचा उद्देश. शासनाचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असला तरी ज्यांच्या खांद्यायावर योजनेची धुरा होती, त्यांनी योजनेसंदर्भात योग्य नियोजन न केल्याने या योजना अर्धवट स्थितीत पडून आहेत.योजनेसंदर्भात उल्लेखनीय बाब अशी की, या सर्व योजनांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या रुपात अर्र्धी किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम प्राप्त झाली आहे. मिळालेल्या या रकमेतून या योजनाच्या विहिरीचे, काही ठिकाणी जलकुंभाचे तर काही ठिकाणी पाईप लाईनचे काम करण्यात आले आहे. यापलिकडे हे काम पुढे सरकलेच नाही. यात उल्लेखनीय बाब अशी की या प्रत्येक योजना २५ ते ५० लाखादरम्यान आहेत. गावातील पाणीपुरवठा समितीकडे या योजनेचे काम सोपविण्यात आले होते आणि यावर देखरेख जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची होती. यात अडचणीची गोष्ट अशी की गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम सांभाळणाऱ्या समितीची निवड जरी ग्रामसभेतून होत असली तरी योजनेचे महत्व न कळणाऱ्या व योजनेसंदर्भात पुरेसे प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीकडे ही योजना सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांवर असे दिवस आल्याचे यासंदर्भात बोलले जात आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)या समितीत ग्रामसभेतून निवडलेल्या व्यक्तीसोबत गावातील ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांचा या समितीत सचिव म्हणून समावेश करण्यात आला असता तर या अधिकाऱ्यांनी आपल्या शासकीय नोकरीची भीड राखून योजनेचे काम चोख केले असते. परिणामी आज ज्या संख्येत योजना अपूर्ण दिसत आहेत त्याची संख्या निश्चित कमी दिसली असती.यातील अनेक योजना निर्मल ग्राम योजनेच्या बळी ठरल्या आहेत. योजनेला मंजुरी देताना निर्मल ग्राम योजनेची कोणतीही अट लादण्यात येत नव्हती. मात्र योजनेचे काम सुरु झाल्यानंतर तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज केल्यानंतर आपले गाव १०० टक्के निर्मल झाले का, अशी विचारणा करुन पुढचे हप्ते नाकारण्यात येत होते. जे गाव निर्मल आहे त्याच गावांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले असते तर शासनाच्या निधीचा असा चुराळा झाला नसता.