वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघींनी कुटुंबाला सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:27+5:30

वडील कोरोनाने गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर  घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्या दोन बहिणींवर आली. पण  न डगमगता त्या दोघींनीही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी ट्रॅक्टर शिकून घेतले असून अगदी सराईतपणे त्या ट्रॅक्टर चालवतात. काजल आणि कोमल भाजीपाले असे या दोन जुळ्या बहिणींची नावे असून त्या नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील रहिवासी आहेत.

After the death of their father, they reunited the family | वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघींनी कुटुंबाला सावरले

वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघींनी कुटुंबाला सावरले

ठळक मुद्देट्रॅक्टर चालवून स्वत:च करू लागल्या शेती

घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड: परिस्थिती माणसाला सर्वच   शिकवते, असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण पाहार्णी येथील दोन बहिणींच्या रूपात पाहायला मिळत आहे. मुली असूनही त्या एखाद्या तरुणास जमणार नाही, असे काम त्या करीत आहेत.
   वडील कोरोनाने गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर  घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्या दोन बहिणींवर आली. पण  न डगमगता त्या दोघींनीही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी ट्रॅक्टर शिकून घेतले असून अगदी सराईतपणे त्या ट्रॅक्टर चालवतात. काजल आणि कोमल भाजीपाले असे या दोन जुळ्या बहिणींची नावे असून त्या नागभीड तालुक्यातील पाहार्णी येथील रहिवासी आहेत. काजल आणि कोमलला आणखी तीन बहिणी असून त्यांची लग्न झालेली आहेत. काजलने बीएसडब्लू तर कोमलने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोघीही अभ्यासात हुशार आहेत. घरी वडिलोपार्जित साडेचार एकर शेती आहे. त्या वडिलांना नेहमीच भाजीपाल्याच्या उत्पादनासह शेतीच्या कामात मदत नेहमीच करीत होत्या.
            सर्व सुरळीत सुरू असतानाच  वडिलांना एप्रिल महिन्यात कोरोनाची बाधा झाली. यातच वडिलांचा मृत्यू झाला आणि या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र या बहिणींनी हातपाय गाळत न बसता परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्धार केला. चुलत भावांकडे असलेले ट्रॅक्टर त्यांनी मागितले आणि ते शिकून घेतले. त्याच ट्रॅक्टरने त्या शेतीची मशागत करीत आहेत.

Web Title: After the death of their father, they reunited the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.