शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रसायनयुक्त पाणी झाले बंद

By admin | Updated: November 17, 2015 01:58 IST

शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे

सास्ती : शुक्रवारी बल्लारपूर पेपर मिलमधून रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे नदी काळवंडली व नदीतील शेकडो मासे व जलचर प्राणी मृत्युच्या छायेत असल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच, प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी सुरू केली असून सदर घटनेची पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली असून पोलीस यंत्रणाही चौकशीला लागली असल्याने नेमकी काय कारवाई होईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.प्राप्त माहितीनुसार १३ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पेपर मिलमधील रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत सोडल्या गेल्यामुळे नदी काळवंडली. रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर नदीतील जलचर प्राणी मृत्युच्या छायेत आहे. या पाण्यामुळे परिसरातील पशुधनही धोक्यात आले आहे तर सदर पाणी शेतीला दिल्यामुळे शेतीचेही नुकसान होत आहे. वर्धा नदीवरुन अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा होत असल्यामुळे मानवजातीलाही धोका निर्माण झाला.या संदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासकीय यंत्रणा सरसावली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने चौकशी सुरु केली आहे. तर पोलीसातही तक्रार झाली असन तपास सुरू आहे तर यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली गेली असून यावेळी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनावर नेमकी कोणती कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)पेपर मिल व्यवस्थापनानेही घेतली दखलपेपर मिलच्या ईपी प्लांटमध्ये बिघाड आल्याने दुरुस्तीचे काम सुरू केले होते. त्या दरम्यान रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्या गेले त्यामुळे अशी घटना घडली. परंतू लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पेपर मिल व्यवस्सथापनाने दखल घेत सदर प्लांट दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले. मोठ्या प्रमाणात कामगार वापरून सदर काम पूर्ण केले असून सध्या ईपी प्लांट दुरुस्त झाल्याने रसायनयुक्त पाणी नदीत येणे बंद झाले आहे. आणखी काही दिवस हे काम सुरू असते तर मात्र मोठी हाणी झाली असती. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे.पोलिसात तक्रार दाखलवर्धा नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्या गेल्यामुळे होणाऱ्या दुष्परीणामाकडे बघता बल्लारपूरचे माजी नगरसेवक तथा भाजयुमोर्चा चे माजी जिल्हा सरचिटणीस निलेश खरबडे यांनी बल्लारपूर पेपर मिल व्यवस्थापनाविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिळसकर यांनी चौकशी सुरू केली आहे.