शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आसोलामेंढा जलाशय परिसरात शिकारी टोळी सक्रिय

By admin | Updated: June 4, 2015 01:15 IST

ब्रह्मपुरी व चंद्रपूर वनविभागाच्या मध्यभागात असलेल्या व भौगोलिकदृष्ट्या सावली तालुक्यात येणाऱ्या सावली वन परिक्षेत्र व ब्रह्मपुरी, सिंदेवाही ....

गेवरा : ब्रह्मपुरी व चंद्रपूर वनविभागाच्या मध्यभागात असलेल्या व भौगोलिकदृष्ट्या सावली तालुक्यात येणाऱ्या सावली वन परिक्षेत्र व ब्रह्मपुरी, सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या वनपरिसरात भ्रमण करणाऱ्या वन्यप्राण्यांचा सुरक्षित आश्रयस्थान असलेल्या आसोलामेंढा तलाव परिसरात शिकारी टोळी सक्रीय झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. या जलाशयाशेजारी असलेल्या अनेक मानवी वसाहती या जंगल व्याप्त असल्याने वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असणे नित्याचीच बाब झाली आहे. सद्यस्थितीत या जलाशयात अत्यंत कमी प्रमाणात पाणी साठून असल्याने जलाशयाचा बराच भाग रिकामा झालेला आहे. जलाशयाच्या पार्श्वभागापुढील असलेल्या वनातून वन्यजीव पाणी पिण्यासाठी येतात. याचाच फायदा या भागात सक्रीय असलेल्या शिकारी टोळ्या घेत असतात. ३० जूनला गुंजेवाही येथील पोलीस पाटील वंदना चन्ने यांचे पती हे खाजगी कामानिमित्य याच जलाशयामार्गे पाथरी येथे जात असताना जलाशयाच्या काठाजवळ शिकारी आढळून आले. याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला देण्यात आली. घटनास्थळाची संपुर्ण पाहणी करून गंभीर प्रकाराची माहिती वनपरिक्षेत्र सावली व सिंदेवाही यांना दिली. लागलीच वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन चौकशी केली असता त्या परिसरात जाळे लावल्याचे दिसले. सदर शिकारी जाळे हे २५ मीटर लांब व ७ मीटर रूंदीचे असल्याचे निदर्शनास आले. सदर जाळ्याचे निरीक्षण केले असता त्याला रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे वनअधिकाऱ्यांनी प्राथमिक अंदाजावरून मागील आठवड्यात वन्यप्राण्याची याच जाळ्याचे सहाय्याने शिकारी टोळीने शिकार केल्याचा निष्कर्ष काढला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम १९७२ ची कलम ९ अन्वये वनगुन्हे दाखल करण्यात आले.अज्ञात शिकारी टोळीचा शोध घेण्यासाठी वनविभागाची एक विशेष चमु कामाला लागल्याने आता शिकारी टोळके वनविभागाच्या रडारवर आहे. असे असले तरी ही शिकारी त्याच परिसरात सक्रीय असल्याची माहिती आहे. या परिसरात वनविभागासोबतच एफडीसीएमचेही जंगल आहे.त्यामुळे क्षेत्र कुणाचे, या प्रश्नावरून कारवाई करण्यास ढिलाई केली जाते. परिणामी वनाच्या संवर्धनाची व वन्यजिवांच्या रक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान वन्यजिवांचे रक्षण करावे, अशी अपेक्षा करणे वन्यजीवप्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहे. सदर जलाशय हे पाटबंधारे विभाग गोसेखुर्द प्राधिकरणकडे हस्तांतरित केल्याने याची जबाबदारी मात्र सावली येथे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांकडे आहे.या प्राधीकरणचा स्वतंत्र पुर्ण वेळचा अधिकारी नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या जलाशयाचा विस्तार करण्यासाठी अनेक वर्षापासून शासन स्तरावरील निर्णय कागदोपत्रीच रखडला आहे. येथील विश्रामगृह परिसराचाही गैरकृत्यांसाठी वापर होताना दिसत आहे. याच स्थळापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे, वनविभागाचे क्षेत्र सहायक मुख्यालय तसेच वनविकास महामंडळाचे परिक्षेत्र मुख्यालयसुद्धा आहे. एवढी मोठी जबाबदार प्रशासकीय यंत्रणा असताना अशा असामाजिक कृत्यांवर नियंत्रण नसणे ही बाब चिंतनीय आहे.या सर्व बाबींचा विचार केल्यास या परिसरातील वनसंपदा, वन्यजीव व जैवविवीधता नष्ट होण्यास ही गैरकृत्य व असामाजिक तत्वेच कारणीभूत ठरणार आहे. यासाठी सर्व संबंधीत विभागाने गंभीर होणे अत्यावश्यक आहे. (वार्ताहर)