शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पतंगासाठी नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST

चंद्रपूर : शहरात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास, साठवणूक तसेच वापर करताना आढळल्यास कारवाई ...

चंद्रपूर : शहरात पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री केल्यास किंवा मांजा वापरल्यास, साठवणूक तसेच वापर करताना आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा महानगर पालिकेतर्फे दिला आहे.

चंद्रपूर शहरात पतंग उडविताना पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी व नायलॉन मांजाच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर गुन्हे आहे. मकरसंक्रांतीच्या आधीच काही दिवस पतंगबाजी सुरू होते. ही पतंगबाजी महिनाभर सुरू असते. पतंगबाजी करताना काटाकाटीच्या स्पर्धेत चिनी व नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे पतंगप्रेमींबरोबरच रस्‍त्यावर चालतानाही जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी तर काही मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायालयाने सरकारला केली.

बॉक्स

नायलॉन मांजाची माहिती देण्याचे आवाहन

राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली. या मांजाची विक्री व वापर सर्रास सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर कारवाई करण्यासाठी महानगर पालिकेने पथके गठित केली. मनपा हद्दीतील दुकानांना याबाबत सूचना देण्यात येत आहेत. आपल्या आजूबाजूला नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर करताना कुणी आढळल्यास कळवावे, असे आवाहनही महानगर पालिकेने केले.