Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन

By राजेश भोजेकर | Published: May 3, 2023 10:16 AM2023-05-03T10:16:44+5:302023-05-03T10:17:40+5:30

Tadoba Sanctuary: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबात ९१ वाघ व शंभरावर बिबटे असले तरी काळा बिबट्या ताडोबात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

A heartwarming sighting of a black leopard at Tadoba Sanctuary | Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन

Tadoba: ताडोबा अभयारण्यात काळ्या बिबट्याचे मनसोक्त दर्शन

googlenewsNext

- राजेश भोजेकर
चंद्रपूर - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याने पर्यटकांना दर्शन दिले आहे. ताडोबात ९१ वाघ व शंभरावर बिबटे असले तरी काळा बिबट्या ताडोबात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

जगप्रसिद्ध ताडोबा प्रकल्पात देश विदेशातील पर्यटक पट्टेदार वाघ तथा बिबत बघण्यासाठी येतात. मात्र आ वाघ व बिबट्या सोबत काळा बिबट्या हा ताडोबाच्या मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. बहुसंख्य पर्यटकांना काळा बिबट्या दर्शन देत आहे. गेल्या महिन्यात काळा बिबट्या त्याचा दोन पिल्लांसोबत जंगलात भटकंती करताना पर्यटकांना दिसला होता. तेव्हा त्यांचा जंगल भ्रमंतीचा व्हिडिओ चांगलाच सार्वत्रिक झाला होता.

आता पुन्हा एकदा काळा बिबट्या दिसताच पर्यटक आनंदी झाले. ताडोबाच्या पांढरपौनी जवळील चिखलवाही वाटर होल जवळ या काळा बिबट्या ने दर्शन दिले आहे. पर्यटक पी.वी. सुब्रमण्यम यांनी काळ्या बिबट्याचे फोटो काढले आहेत. काळा बिबट्या हा पाणवठ्यावर पाणी पित असताना हे फोटो काढण्यात आले आहेत. सुब्रमण्यम यांच्या सोबत इतर अनेक पर्यटकांना या काळ्या बिबट्याने दर्शन दिले आहेत.

Web Title: A heartwarming sighting of a black leopard at Tadoba Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.