शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५३ निवारागृहात ९७३ जण आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात आलेत. मात्र २४ मार्चला देशात सर्वत्र संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आला.

ठळक मुद्देसंडे अ‍ँकर। दररोज दोन वेळचे जेवण, मात्र इतर सुविधांची वाणवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व दुकाने, उद्योग, दळणवळणाची साधने व कामे बंद आहेत. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील काही मजूर व नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात अडकले आहेत. त्यांच्या रहिवासासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी २७१५ जणांची क्षमता असलेले ५३ निवारागृहांची व्यवस्था केली आहे. या निवारागृहात सध्या ९७३ जण वास्तव्यास आहेत. दोन वेळच्या जेवण तर येथील लोकांना दिले जाते. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश निवारागृहात इतर सुविधांची वानवा आहे.उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात आपल्या जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात जातात. त्याचप्रमाणे बाहेर जिल्ह्यातील नागरिकही मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात येतात. यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यातही अनेक मजूर, कामगार रोजगाराच्या शोधात चंद्रपूर जिल्ह्यात आलेत. मात्र २४ मार्चला देशात सर्वत्र संचारबंदी लागू करून लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे मजूर, कामगारवर्ग येथेच अडकून पडला. त्यांच्या राहण्याचा, जेवण्याचा प्रश्न होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी या मजुरांसाठी निवारागृहांची व्यवस्था केली.सुविधा नसल्याने आश्रयितांमध्ये नाराजीनिवारागृहांमध्ये असलेल्या नागरिकांना पाणी, चहा, सकाळचा नाश्ता, सकाळ-सायंकाळ दोन वेळ जेवण दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश निवारागृहात जेवणाव्यतिरिक्त इतर सुविधा नाही. हाताला काम नाही आणि करमणुकीचेही साधन नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या