शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

९३ हजार बहीण-भावाच्या प्रेमाला डाक विभागाने बांधले रेशीम बंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्टमनने केले आहे. यावर्षी तब्बल १५ हजार राख्या चंद्रपूर जिल्ह्यातून बाॅर्डरवर पोहचविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देचंद्रपूरात १८ हजार राख्यांचे वितरण

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहीण भावाच्या नात्याला एकत्रित बांधून ठेवण्यासाठी पोस्ट कार्यालय नेहमीच महत्त्वाचा धागा ठरले आहे. यावर्षी सुटीच्या दिवशीही अविरत सेवा देत पोस्टमनने भाऊ-बहीणींमध्ये आत्मिक प्रेमाचे नाते जपले आहे. यावर्षी तब्बल ९३ हजार राखी जिल्हा, देश तसेच देशसेवा करणाऱ्या सैनिक भावांना पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्ट विभागाने केले आहे.प्रत्येक वर्षी बहिणीला भावाकडे आणि भावाला बहिणीकडे जाणे शक्य होत नाही. कोरोना संकट तसेच येणे अशक्य असल्यामुळे असंख्य बहिणींनी यावर्षीही डाकेने राख्या पाठविणे पसंत केले आहे. पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे महत्त्वाचे काम पोस्टमनने केले आहे. यावर्षी तब्बल १५ हजार राख्या चंद्रपूर जिल्ह्यातून बाॅर्डरवर पोहचविण्यात आल्या आहेत.कोरोनामुळे निर्बंध आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून पोस्टाने राख्या पाठविण्याच्या प्रमाणात  वाढ झाली आहे. पोस्ट विभागानेही तत्परतेने भावांपर्यंत राख्या पोहचवित भाऊ-बहीणींच्या प्रेमात आणखीच आत्मियता निर्माण केली आहे. यासाठी सिनिअर पोस्टमास्टर कोमकोमवार, असिस्टंट पोस्टमास्टर (मेल) प्रशांत कन्नमवार, मेल शार्टर राजू मत्ते यांच्यासह जिल्ह्यातील विविभ गावातील पोस्टमनने आपले काम चोखपणे बजावले आहे. रविवारी सुटी तसेच रक्षाबंधन असतानाही गावागावातील पोस्टमन राख्या पोहचवून देण्याच्या कामात मग्न असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळाले.चंद्रपूरात १८ हजार राख्यांचे वितरणचंद्रपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत १८ हजार राख्यांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारपर्यंत १० हजार तसेच रविवारी दुपारपर्यंत ८ हजार राख्या पोहचविण्यात पोस्टमनने दिवसरात्र        एक करीत बहीण- भावाच्या नात्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका जावली आहे.

बाहेरगावी पाठविल्या ६० हजार राख्याभारतीय डाक विभागाने ६० हजार राख्या बाहेर जिल्ह्यासह इतर राज्यात पाठविल्या आहेत. बहिण भावाचे हे नाते जोपासण्यासाठी डाक विभागाकडून आधार दिला जात आहे. कोरोना संकटामुळे यावर्षीही अनेक बहिणी भावाच्या भेटीला जाऊ शकल्या नाही. त्यांच्यासाठी पोस्टमनने भावाची भूमिका बजावत आपले कर्तव्य पार पाडले.

रक्षाबंधणाचा सण महत्त्वाचा असतो. त्यामुळे पोस्ट कार्यालयाने यावर्षीही सुटीच्या दिवसी राख्या घरपोच वितरणाचे काम केले आहे. जिल्ह्यात ३५० पोस्टमनने हे कर्तव्य बजावले आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही कोरोना संकटामुळे अनेकांनी गावी जाणे टाळले. त्यामुळे पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात राख्या वितरणाचे काम होते. ते सक्षमपणे सर्वांनी बजावले.- प्रशांत कन्नमवार असिस्टंट पोस्टमास्टर मेल, चंद्रपूर

 

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaksha Bandhanरक्षाबंधन