शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

पार्श्वनाथ मंदिरामध्ये कार्यरत ८२ कर्मचारी बेमुदत संपावर

By admin | Updated: February 28, 2015 01:23 IST

येथील पार्श्वनाथ मंदिरमध्ये कार्यरत ८२ कर्मचारी आपल्या आपल्या विविध मागण्यांसाठी २७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर बसले आहे.

भद्रावती : येथील पार्श्वनाथ मंदिरमध्ये कार्यरत ८२ कर्मचारी आपल्या आपल्या विविध मागण्यांसाठी २७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर बसले आहे. २६ फेब्रुवारीला कर्मचाऱ्यांतर्फे एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. परंतु मंदिर व्यवस्थापनासोबत कुठल्याही प्रकारे चर्चा न झाल्याने शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत सुरू केला आहे.दि. कमर्शियल अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल लेबर युनियन भद्रावती (संलग्नीत भारतीय मजदूर संघ) तर्फे संबंधित मागण्यांचे निवेदन मंदिर व्यवस्थापनाला देण्यात आले होते. त्यात सर्व कामगारांना दरवर्षी प्रमाणे वेतनवाढ कमीत कमी २००० रुपये देण्यात यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमीत कमी ६० रुपये मजुरी वाढ मिळण्यात यावी, सर्व वाऊचर आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थाई करण्यात यावे, ग्रुप इंन्शुरन्स १ जानेवारीपासुन लागु करण्यात यावा, सर्व कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लीप देण्यात यावी व बँकेतुन पगार करण्यात यावे, सर्व कर्मचाऱ्यांना पी. एफ. कपात करण्यात यावी, मंदिराद्वारे दिलेल्या आवासात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे त्वरीत निवारण करण्यात यावे या बाबींवर विचार करण्याच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले होते. मंदिरात कार्यरत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा २०१४ मध्ये झालेला करार ३१ डिसेंबर २०१४ ला संपलेला आहे. नविन करार जाने २०१५ पासून लागू करण्याकरीता संघटनेच्या वतीने व्यवस्थापनाला २ पत्र देण्यात आली आहे. परंतु व्यवस्थापनाकडून याबाबत दखल घेण्यात आलेली नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांना तोंडी आदेशान्वये सेवा खंडित करणे, कामावरून कमी करण्याबाबत सांगणे असे प्रकार घडत आहे, असेही निवेदनात नमुद केले आहे. व्यवस्थापनातर्फे सदर मागण्या त्वरीत मंजूर कराव्यात, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन ना. सुधिर मुनगंटीवार व आमदार बाळू धानोरकर यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी भा.म.स. चंद्रपूरचे संघटनमंत्री मनोहर साळवे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर आवारी, सचिव संदिप घोटेकर, सहसचिव कवडू नरूले, लाला मिश्रा, विजय क्षिरसागर, विलास घोटेकर, पुंडलिक चवरडोल, रामदिन यादव, वैशाली डांगे, ज्योती रणदिवे, शिला रोकडे व अन्य कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)