शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

१७ जागांसाठी ७६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

By admin | Updated: October 11, 2015 02:19 IST

येथील नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत १७ जागांसाठी ७६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

पोंभुर्णा : येथील नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत १७ जागांसाठी ७६ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शुक्रवारी अर्जाची छानणी करण्यात आली. छाननी दरम्यान कोणत्याही अर्जात त्रुटी आढळून न आल्याने ७६ नामांकन अर्ज कायम ठेवण्यात आले. १९ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याचे शेवटची तारीख असली तरी काही महिला उमेदवारांनी आपल्या वॉर्डात प्रचार मोहिमेला सुरुवात केली असल्याने निवडणुकीला वेगळा रंग चढला आहे. नव्यानेच निर्माण झालेल्या पोंभूर्णा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबरला होत असून गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ व तहसीलदार हरिश माठे यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केले.पोंभूर्णा नगरपंचायतीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असल्याने नागरिकांसह इच्छुक उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी तहसीलदार कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना, बसपा, रिपाइं, अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल केले.प्रथमच होत असलेली पोंभुर्णा नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे. १७ जागांसाठी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी नऊ जागांवर महिलांना तर आठ आठ जागांवर पुरुषांना समाधान मानावे लागणार आहे. या निवडणुकीत सुमारे चार हजार ९७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात येणारा हा भाग असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीची सत्ता आपल्या पक्षाकडे राहण्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपा पदाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी कानमंत्र दिला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, घनश्याम मुलचंदानी, गजानन गावंडे, विनोद अहीरकर, संजय महाडोळे, वागदरकर, पडवेकर यांनीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन जोरदार फिल्डींग लावल्याचे समजते. यामध्ये शिवेसनासुद्धा मागे नसून आमदार बाळू धानोरकर यांनी आपली चमू तयार करुन कार्यकर्त्यांसह पोंभूर्णा परिसर पिंजून काढला.एकूणच या निवडणुकीला आता वेगळा रंग चढत असून पान टपरी चालकांना मात्र सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पोंभूर्णा ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता होती. पंचायत समितीवर आणि बाजार समितीवरसुद्धा भाजपाची सत्ता असल्याने आणि पालकमंत्री मुनगंटीवार यांचे हे क्षेत्र असल्याने नगरपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा मात्र मागे पुढे पाहणार नसल्याचे हौस्या- गौश्यांमध्ये चर्चा सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)