शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सैनिक शाळेकरिता मिळणार ७६ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:01 IST

सैनिक शाळा हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्र्रपूरची सैनिकी शाळा होय. भारतातील २६ सैनिक शाळांपैकी अतिशय उत्तम वास्तू चंद्र्रपुरात पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित : लढाऊ विमान व सहा अश्व लवकरच उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील सैनिक शाळेच्या बांधकामासाठी ७६ कोटींचा निधी वितरीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. शालेय शिक्षण विभागाने सोमवारी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सैन्य दलाच्या माध्यमातून लवकरच लढाऊ विमान, रणगाडे आदी साहित्यांसह ६ अश्व सैनिक शाळेत उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्षात असतानाही राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोट्यवधींचा हा निधी खेचून आणल्याने मोठी उपलब्धी मानली जात आहे.सैनिक शाळा हा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी प्रमुख निर्णय म्हणजे चंद्र्रपूरची सैनिकी शाळा होय. भारतातील २६ सैनिक शाळांपैकी अतिशय उत्तम वास्तू चंद्र्रपुरात पूर्ण झाली आहे. पहिली सहाव्या वर्गाची तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांच्या माध्यमातुनच आमदार मुनगंटीवार यांना सैनिक शाळेच्या स्थापनेची प्रेरणा मिळाली. चंद्रपूर व बल्लारपूर मार्गावरील भिवकुंड जवळील १२३ एकरातील सैनिक शाळेची वास्तू पूर्णत्वास आली. शाळेत भारतातील अद्ययावत सैनिक संग्रहालय आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महू येथील सैनिकी संग्रहालयापेक्षाही अधिक उत्तम असे हे संग्रहालय आहे. ताडोबा पर्यटकांनाही सैनिक शाळेच्या दर्शनी भागात भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली. आमदार मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २०२० सत्रापासून मुलींना सैनिकी शिक्षणाची दारे खुली झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली असता या शाळेचे कौतुक केले आहे.भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे सुविधासैनिक विद्यालयाच्या निरीक्षण कक्षातून संपूर्ण कॅम्पस बघता येतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे उभारले जात आहेत. कारगिल युद्ध, भारताचे माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट सभागृहात दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर आदी सर्व लढाऊ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. सैनिक शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत चंद्रपुरातील गोंड किल्ल्याप्रमाणे तर मैदान आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँक आणि सर्व सोईसुविधा भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे सज्ज आहेत.