शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड तालुक्यातील ७२ नागरिक विलगीकरण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST

भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. केजीबीव्ही वसतिगृहामधे १८ बेडची व्ववस्था करण्यात आली होती. त्या केंद्राचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालय । आयसोलेशन वॉर्डमध्ये २ बेडची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. येथील आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.भामरागड तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पीएचसीअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रांतर्गत विशेष खबरदारी घेतली जात आहे. ज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप आहे अशा रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. भामरागड येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्र आहेत. केजीबीव्ही वसतिगृहामधे १८ बेडची व्ववस्था करण्यात आली होती. त्या केंद्राचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर झाले आहे. आतापर्यंत ७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोघांमध्ये १४ दिवसात कसल्याही प्रकारची लक्षणे दिसली नाही. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली. आणखी ५ जण या कक्षात आहेत. भामरागड येथील भगवंतराव प्राथमिक तथा जय पेरसापेन माध्यमिक आश्रम शाळा निवासगृहात ९ जण, शिव मंदिर निवास गृहात १७ जण आहेत. परराज्य व जिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा भामनपल्ली येथे ८ जण, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ताडगाव येथे ४२ जण, मन्नेराजारामच्या राजे धर्मराव माध्यमिक आश्रम शाळा विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आले आहे. सध्या ७२ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आदिवासी आश्रम शाळेत कोविड केअर सेंटर आहे. या लोकांच्या जेवणाची व्यवस्था तहसील कार्यालयाने केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल