शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या दहशतीत विद्यार्थ्यांची ७ कि.मी. पायपीट

By admin | Updated: February 22, 2016 01:22 IST

सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे.

पालक चिंताग्रस्त : वन विभागाने लक्ष द्यावेंसावली : सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर जंगलव्याप्त असलेल्या पालेबारसा कन्हाळगाव या सात कि.मी. रस्त्यावर सतत वाघाचा वावर होत असल्याने पालक चिंताग्रस्त व भयभीत झाले आहेत.कन्हाळगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थ्यांना सावली तालुक्यातील पालेबारसा येथे पायी किंवा सायकलने जावे लागते. मात्र सदर सात कि.मी. च्या रस्त्यावर पाच कि.मी. परिसर संपूर्ण घनदाट जंगलाने व्याप्त आहे. तसेच या परिसरात जंगली श्वापदांचा सतत वावर असतो. सुर्दैवाने आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी भविष्यात कधीही धोका संभवू शकतो. या चिंतेने त्यांचे पालक भयग्रस्त होत आहेत. कधी-कधी रस्त्यांवरच व्याघ्र दर्शन होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळले आहे. दोन्ही तालुक्याच्या मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर शेवटच्या टोकावर असलेले कन्हाळगाव या परिसरातील अतिशय दुर्गम गाव समजले जाते. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानंतरही या गावात अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांकरिता महामंडळाच्या एस.टी.ची सुविधा केली आहे. मात्र येथील विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत. पालेबारसा - कन्हाळगाव या मार्गाचे खडीकरण बऱ्याच वर्षापूर्वी झाले. मात्र ठिकठिकाणी रस्ता उखडल्यामुळे सायकलस्वार व पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीशकालीन आसोलामेंढा तलावाच्या पोटात या गावाचे वास्तव्य आहे. त्यामुळे जंगलातील हिंस्त्र श्वापदांचा वावर दिवसा-रात्री कधी गावाच्या शेजारी होताना दिसतो. त्यामुळे कन्हाळगाव येथील गावकरी दहशतीत जीवन जगत आहेत. या गावातील प्राथमिक सुविधांची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खुशाल लोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)