शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

५९० वेळा एसटीने अर्ध्या रस्त्यात सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:26 IST

चंद्रपूर : ‌प्र‌वाशांच्या सेवेसाठी असे बीद्र असलेल्या एसटीला आजही सामान्य नागरिकांची पसंती आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक बिघाड, पंक्चर यासारख्या ...

चंद्रपूर : ‌प्र‌वाशांच्या सेवेसाठी असे बीद्र असलेल्या एसटीला आजही सामान्य नागरिकांची पसंती आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक बिघाड, पंक्चर यासारख्या समस्या उद्भवत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांत चंद्रपूर विभागाअंतर्गत तब्बल ५९० वेळा एसटी रस्त्यात बंद पडली असून प्र‌वाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

खासगी बसेसच्या स्पर्धेमध्ये सुरक्षित प्रवासासाठी आजही मोठ्या प्रमाणात एसटीला प्रवाशांची पसंती आहे. त्यामुळे अडचणीच्या काळातही चंद्रपूर विभागाने बऱ्यापैकी उत्पन्न मिळवून महामंडळाने आपला डोलारा सांभाळला आहे.

चंद्रपूर विभागांतर्गत चंद्रपूर, राजुरा, वरोरा आणि चिमूर येथे आगार आहे. यासाठी विभागांमध्ये २२५ बसेस आहे. सध्या दररोज १४०५ फेऱ्या केल्या जात असून ८० हजार कि.मी. प्रवास केला जात आहे. चंद्रपूर विभागांतर्गत असलेल्या बसेस दुर्गस तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करीत आहेत. मात्र, मागील वर्षी एप्रिल २०१९ ते मार्च २०२० मध्ये विविध मार्गांवर तब्बल ५३६ बसेस तांत्रिक कारणासाठी बंद पडल्या. यामध्ये पंक्चर होणे, ब्रेक फेल, सुट्या भागाचे नुकसान यासह अन्य बिघाड झाले आहेत. तर एप्रिल २०२० ते जानेवारी २० पर्यंत ५४ बसेस मार्गामध्ये बंद पडल्या. मागील तसेच यावर्षीचे एसटी बंद पडल्याने प्रमाण जास्त वाटत असले तरी प्रवासाच्या तुलनेत तसेच इतर विभागाच्या मानाने चंद्रपूर भागातील एसटी बंद पडण्याचा प्रमाण कमी असल्याचे चंद्रपूर विभागाचे म्हणणे आहे.

सध्या स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे स्पर्धेत टिकण्यासाठी महामंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये नवीने बस खरेदी तसेच शिवशाहीसारख्या बसेस स्पर्धेत उतरविल्या आहेत. एवढेच नाहीतर कोरोनाकाळात संकटाच्या वेळी प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याचे कामही एसटीने केले आहे. मात्र दुरुस्तीवर होणारा खर्च एसटीला महागात पडत आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर महामंडळात १५ आधिकाऱ्यांसह १५६० कर्मचारी विविध विभागात कार्यरत आहेत.

बाॅक्स

आगारनिहाय संख्या

चंद्रपूर ८४

राजुरा ५९

वरोरा ३९

चिमूर ४३

--

बॉक्स

दहा वर्षांवरील २३ बसेस

चंद्रपूर विभागाअंतर्गत २२५ बसेस आहेत. नियमानुसार १० ते १२ वर्षांपर्यंत बस प्रवाशांसाठी चालविली जाते. त्यानंतर मालवाहतूक तसेच स्कॅपमध्ये बस काढली जाते.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटीकडून विशेष काळजी घेतली जाते. नियमित स्वच्छता तसेच मेन्टेनन्ससुद्धा वेळावेळी केल्या जात असल्याची माहिती आगारातून मिळाली आहे.

कोट

सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर आहे. काहीवेळा प्रवासादरम्यान बस बंद पडली तरीही प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी दुसऱी बस उपलब्ध करून देत सुविधा पुरविल्या जाते.

-आर. एन. पाटील

विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

-

आगारनिहाय संख्या

चंद्रपूर ८४

राजुरा ५९

वरोरा ३९

चिमूर ४३

---

एसटी मेंटेनन्सवर लाखोंचा खर्च

चंद्रपूर विभागात असलेल्या एसटीच्या मेन्टनन्सवर वर्षाकाठी लाखो रुपये खर्च केला जात आहे. यामध्ये बसेस दुरुस्ती, देखभालीवर हा खर्च होताे. हा खर्च विभागीय कार्यालयाकडून होतो. यासाठी अधिकाऱ्यांची विशेष परवानगी घ्यावी लागते. चेचिस आणि इंजीनवर हा खर्च अधिक होताे.

बाॅक्स

एकूण बस २२५