शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून ५४४ कामे झाली पूर्ण

By admin | Updated: September 3, 2016 00:39 IST

जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे.

जलयुक्त शिवार : लोकसहभागातून काढला ४.४६ लक्ष घनमीटर गाळचंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे. समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा या अभियानात सक्रीय सहभाग लाभत आहे. जिल्ह्यातही अभियानास चांगला प्रतिसाद लाभत असून त्यामुळेच केवळ एका वर्षात लोकसहभागातून तब्बल ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, शेततळ्यातून काढण्यात आला आहे.जनकल्याणकारी कुठलेही अभियान किंवा योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. लोकांना सदर अभियान आपले वाटले तरच ते यशस्वी होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. लोकांचा सहभाग लाभलेल्या योजना यशस्वी झाल्याची अलिकडच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान राबविताना लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात करोडो रुपए किंमतीची हजारो कामे अभियानांतर्गत लोकसहभागातून झाली आहे. या चळवळीत जिल्ह्यानेही आपला भरीव लोकसहभागाचा वाटा दिला आहे.पहिल्या वषार्साठी जिल्ह्यातील २१८ गावे अभियानासाठी निवडण्यात आली होती. या गावांमध्ये ठिकठिकाणी काही कामे लोकसहभागातून करण्यात आली. लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामांची संख्या तब्बल ५४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या कामातून ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, नाले, शेततळे यातून काढण्यात आला आहे. तलाव, नाला, बंधाऱ्यात गाळ साचल्याने, त्यात पाणीसाठा अल्प प्रमाणात होतो. पाणी संचय क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे फार महत्वाचे असते. त्यामुळे या कामासाठी लोकसहभाग घेतल्याने ही कामे होऊ शकली. लोकसहभागातून केलेल्या या कामांवर अत्यावश्यक बाबीसाठी शासनाच्यावतीने दोन कोटी रुपए खर्च करण्यात आले आहे. खाजगी किंवा शासन नियंत्रणातील कंपन्यांना आपल्या सामाजिक दायित्वांतर्गत उत्पन्नातील काही रक्कम लोकहितोपयोगी कामांवर खर्च करावी लागते. त्याअंतर्गत जिल्ह्यात विविध कंपन्यांच्या सामाजिक निधीतून जलयुक्त शिवार अभियानाची १९ कामे पूर्ण करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या निधीतून १ लक्ष ८४ हजार घनमिटर गाळ काढण्यात आला असून सामाजिक दायित्व निधीतून २४ लक्ष खर्च झाले. (स्थानिक प्रतिनिधी)