शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील ३८ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात ! पडताळणी शिबिरात गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:34 IST

Chandrapur : मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पडताळणी मोहीम पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वर्ग-३ व वर्ग-४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. ३ व ४ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या विशेष शिबिरात एकूण २४४ कर्मचाऱ्यांपैकी २०६ कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण केली. दरम्यान, ३८ कर्मचारी अनुपस्थित राहिल्यामुळे आता हे कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा प्रमाणपत्र पडताळणीसाठी मुभा देण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही पडताळणी मोहीम पार पडली. मागील काही वर्षामध्ये दिव्यांगाच्या नावाने सुदृढ असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी योजनांचा लाभ घेतल्याचे बोलल्या जात आहे.

कारवाईची शक्यता

जिल्हा परिषदेने ३ आणि ४ नोव्हेंबरला दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणीसाठी शिबिर आयोजित केले होते. असे असले तरी तब्बल ३८ कर्मचारी गैरहजर होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे आता त्यांच्याकडे संशय वाढला आहे. 

पुन्हा एक चान्स

अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे मूळ दिव्यांगत्व प्रमाणपत्रासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. पडताळणीदरम्यान प्रमाणपत्र चुकीचे, बनावट किंवा दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्यास, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: 38 Disabled Employees Under Suspicion, Absent from Verification Camp

Web Summary : 38 Chandrapur Zilla Parishad disabled employees face scrutiny after missing certificate verification. A second chance is granted, but strict action awaits those with false or inadequate disability certificates.
टॅग्स :Governmentसरकार