शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
6
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
7
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
8
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
9
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
10
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
11
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
12
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
13
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
14
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
15
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
16
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
17
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
18
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
19
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
20
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
Daily Top 2Weekly Top 5

भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या 370 ऑनलाईन तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : ६९,२३३ हेक्टर क्षेत्र बाधित

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील ९७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत विमा काढला. विमा हप्त्याची रक्कम २९४ कोटी एवढी आहे. हंगातील प्रतिकूल स्थितीमुळे विमाधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ३७० शेतकऱ्यांनी ७२ तासात विमा कपंनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या. प्रशासनाकडून जलदगतीने पाठपुरावा झाला. मात्र, भरपाई अद्याप मिळाली नाही.  जिल्ह्यात ७६, २९८ कर्जदार व बिगर कर्जदार २० हजार ७२३ शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यासाठी शेतक-यांनी ७ कोटी २९ लाख,  केंद्र सरकार व राज्य सरकारकडून प्रत्येकी  १३ कोटी, ९७ लाखांचे अनुदान असे एकूण ३५ कोटी २३ लाखांचा विमा हप्ता मंजूर झाला. पीक विम्यामुळे  ६९ हजार २३३. ९८ हेक्टर शेती विमा संरक्षित झाली. स्थानिक नैसगीर्क आपत्ती व काढणी पश्चात पिकांचे नुकसान झाले.  ३७० शेतक-यांनी ७२ तासात ऑनलाईन तयारी केल्या.  जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने लगेच पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे सवेक्षणाचे काम पूर्ण झाले. परंतु विमा कंपन्यांकडून मदत मिळाली नाही.

तक्रारदार सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामेप्रधानमंत्री पीक विमा काढणा-या शेतक-यांनी ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेतली. पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला. नैसगीर्क आपत्ती २६४, प्रतिकूल हंगाम ९ हजार ५८५ व पीक काढणी पश्चात नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई मिळाल्याने खरीप हंगामात दिलासा मिळाला आहे.

९,५८५ शेतकऱ्यांना भरपाईयंदाच्या खरीप हंगामात स्थानिक नैसगीर्क आपत्तीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यात मोठे नुकसान झाले. वैनगंगा नदीला पूर आल्याने शेती उद्धवस्त झाली. प्रशासनाकडे लगेच कार्यवाही केली. त्यामुळे ९ हजार ५८५ शेतक-यांना भरपाई मिळाली. हंगामातील प्रतिकूलता व काढणी पश्चात नुकसानीचीही भरपाई लवकरच मिळणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा काढणाºया सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली. संपर्क साधणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य माहिती दिली जात आहे. सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले. शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे.- डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा