शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

३७० कोल्हापुरी बंधारे नादुरूस्त

By admin | Updated: February 28, 2015 01:20 IST

जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प ...

चंद्रपूर : जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत १०० हेक्टर पर्यंत विविध सिंचन योजना कार्यान्वीत आहेत. मात्र, या सिंचन प्रकल्पांची योग्य देखभाल होत नसल्याने हे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहेत. जिल्ह्यातील ६३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी तब्बल ३७० बंधारे हे फुटलेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. जिल्हा परिषद सिंचाई विभागामार्फत ८५ लघु पाटबंधारे तलाव, १६७८ माजी मालगुजारी तलाव, ५ पाझर तलाव, २८ गाव तलाव व ६३९ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असली तरी, अल्पवधीत हे बंधारे फुटले आहेत. सिंचन वाढीसाठी ८ लघु पाटबंधारे तलाव, ४३९ माजी मालगुजारी तलाव व ३७० कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती आवश्यक असल्याचे सिंचाई सिंचाई विभागाने म्हटले आहे. दुरूस्तीस पात्र ४३९ माजी मालगुजारी तलावांपैकी विदर्भ सघन सिंचन विकास कामातंर्गत ३१५ तलावाच्या दुरूस्तीचे कामे हाती घेण्यात आले आहेत, असे कार्यकारी अभियंता लघु सिंचाई विभाग जिल्हा परिषद यांनी म्हटले आहे. तसेच २२ कामे जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत मंजूर तर तर २९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत ३३ कामे सेस निधीतून सन २०१५-१६ मध्ये व ४० कामे २०१६-१७ मध्ये प्रस्तावित करण्यात येतील, असेही कार्यकारी अभियंता यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्रामपंचायत स्तरावर ४८७ तलावातील गाळ काढण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. व २०१४-१५ च्या नियोजनापैकी सेल्फवर असलेली दुरूस्तीची ७४ कामे घेण्यात आल्याचेही म्हटले आहे. मात्र, अनेक तलावात पाणी साचून राहते. परिणामी गाळ उपसा करण्यास अडचणी येतात. अशा परिस्थतीत गाळ उपसा करण्याचे कामे होणार कशी, प्रश्न नागरिकांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)