शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला', अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
5
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
6
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
7
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
8
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
9
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
10
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
11
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
12
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
13
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
14
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
15
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
16
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
17
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
18
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
19
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
20
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर

पोलिसांच्या मदतीला ३५ लाखांचे बॅरिकेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 12:30 AM

पोलिसांच्या दीमतीला असणारे बॅरिकेट्स म्हणजे दुर्जनांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारे आयुध आहे. समाजातील सज्जनांची सक्रियता वाढावी आणि दुर्जनांचा वावर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करा़ पोलीस विभागाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असतो.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : अपघातशून्य जिल्ह्यासाठी बॅरिकेट्स वापरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोलिसांच्या दीमतीला असणारे बॅरिकेट्स म्हणजे दुर्जनांना रोखण्यासाठी वापरण्यात येणारे आयुध आहे. समाजातील सज्जनांची सक्रियता वाढावी आणि दुर्जनांचा वावर कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करा़ पोलीस विभागाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असतो. या बॅरिकेट्स उपयोग अपघातशून्य जिल्हा बनविण्यासाठी करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनेमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले़ गुरूवारी पार पडलेल्या बॅरिकेट्स लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते़यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत उपस्थित होते. जिल्ह्यातील पोलिसांनी दारूबंदीसारख्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या विभागासाठी कुठलीही मदत करताना आनंद होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.चंद्रपूर पोलीस हे महाराष्ट्रातील सशक्त पोलीस दल म्हणून ओळखले जावे, ही आपली इच्छा असून त्यासाठी पोलिसांना लागणाऱ्या सर्व सुविधा मागणीनुसार दिल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले़ यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सायबर सेल सुरू करण्याचे काम चंद्रपूर पोलिसांनी केले होते.महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात नसेल अशा पद्धतीची अत्याधुनिक व्यायामशाळा पोलिसांसाठी निर्माण करण्यात आली आहे. पोलिसांना उत्तम प्रतीचे शासकीय निवासस्थान मिळावे, यासाठी नवीन वसाहत तयार होत आहे. बल्लारपुरात नवीन पोलीस ठाणे तयार होत आहेत़ याशिवाय तुळजापूर, बाळापूर व तळोधी येथेही ठाणे तयार होत आहे. चंद्रपूरमध्ये पोलिसांना नवीन वाहने, नवीन गाड्या व पोलीस विभागातील सर्व बदल प्राधान्याने मिळावे यासाठी मंत्रालय स्तरावरही आपण प्रयत्नरत असल्याचेही ना़ मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवृत्त पोलीस कर्मचारी व वनकर्मचाºया पंतप्रधान आवास योजनेमधून घर मिळावे यासाठी तरतूद केल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. चंद्रपूर जिल्हा आता विकासाच्या वाटेवर लागला असून नवनवीन प्रयोग होत आहे. पोलिस प्रशासनानेदेखील या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ना़ सुधीर मुनगंटीवार यांनी केले.एव्हरेस्टच्या आॅपरेशन शौर्य मोहिमेनंतर आता जिल्ह्यामध्ये आॅपरेशन शक्ती सुरू करीत असल्याचे जाहीर त्यांनी केले. २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी जिल्ह्यातील दुर्गम भागातील सशक्त व क्रीडा निपुण विद्यार्थ्यांना आॅलिंपिकमधील निवडक खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यावेळी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बॅरीकेट्सच्या छोट्या प्रतिकृती देऊन सन्मानित केले. पोलिसांनी अतिशय सशक्त व कर्तव्यदक्ष असावे, अशी अपेक्षा त्यांनी भाषणात व्यक्त केली. सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यातील पोलीस दलातील विविध विभागांनी मागील वर्षभरात केलेल्या कामगीरीची माहिती सादर केली़ वाहतूक विभागानेदेखील अतिशय उत्तमपणे काम केले असून वर्षभरात एक कोटी रुपयांच्यावर महसूल गोळा केल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्यामुळे तीन पद्धतीचे बॅरिकेट्स मिळाले़ याचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्या राखण्यासाठी पोलिसांना होईल, असा आशावाद व्यक्त केला .चंद्रपूर पोलिसांकडे पालकमंत्री देत असलेल्या विशेष लक्षाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.संचालन मोन्टू सिंग यांनी केले.मिशन शौर्यप्रमाणेच मिशन शक्ती आणि मिशन सेवा२०२४ मध्ये आॅलिंपिकच्या पद तालिकेत भारताचे वाढलेले पदक व त्यामध्ये चंद्रपूरसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या पथकांची संख्या अधिक असेल. मिशन शौर्य प्रमाणेच मिशन शक्ती देखील यशस्वी होईल, अशी आशा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकल्पामध्ये नेमबाजी स्पर्धेेलाही वाव असून पोलीस दलातील जवानांनी देखील या योजनेचा लाभ घेतला पाहिजे़ मिशन शक्तीसोबतच मिशन सेवा जिल्ह्यांमध्ये सुरू होणार असून त्याद्वारे २०२० मध्ये युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यातील किमान पाच मुले उत्तीर्ण व्हावीत, अशी इच्छाही ना़ मुनगंटीवार यांनी जाहीर केली़ यासाठी योग्य नियोजन करीत असून संबंधित क्षेत्रात आवड असणाºयांनी तन्मयतेने पुढे यावे याकडेही त्यांनी लक्ष वेधले़

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार