शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

२५ पाणीपुरवठा योजनांना अ‍ॅटोमॅटिक पंप स्टार्टर

By admin | Updated: December 28, 2016 01:43 IST

लांब अंतरावर असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अनेकदा अडचणी येत होत्या. ही अडचण दूर

जिल्हा परिषदेचा उपक्रम : ५० लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता चंद्रपूर : लांब अंतरावर असलेल्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी अनेकदा अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. या पाणी पुरवठा योजनांना सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार असून यासाठी जिल्ह्यातील २५ पाणी पुरवठा योजनांची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी ५० लाखांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक नळ योजना नदी व नाल्यावर आहेत. तिरावर नळ योजनेची टाकी असताना पंप टाकीपासून लांब अंतरावर असते. पावसाळ्याच्या दिवसांत तसेच इतरही वेळेस पंप सुरू करताना अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे अनेकदा पाणी पुरवठा प्रभावित होत असते. पंपमध्ये बिघाड आल्यास योजनाच बंद पडून गावाचा पाणी पुरवठा बंद असते. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणार आहे. यामुळे घरबसल्या योजना बंद किंवा चालू करता येणार आहे. २०१६-१७ या वित्तीय वर्षात जिल्हा देखभाल निधी ५० लाख रूपये प्रस्तावित करण्यात आली. ५ आॅक्टोंबर २०१६ च्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. यासाठी २५ गावांची निवड करण्यात आली असून स्थायी समितीने ५० लाख रूपयाच्या कामास सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) या गावातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश ४सौर ऊर्जेवर आधारित अ‍ॅटोमॅटीक पंप स्टार्टर बसविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी पाणी पुरवठा योजना, चंद्रपूर तालुक्यातील चेंकनिंबाळा, म्हातारदेवी, घुग्घुस, दुर्गापूर, सिन्हाळा, चांदासुर्ला, भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, पोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नं. २, बोर्डा बोरकर, सातारा तुकूम, नवेगाव मोरे, डोंगरहळदी, पिपरी देशपांडे, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, मानोरा, कोठारी, सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, मूल तालुक्यातील राजोली, खालवसपेठ, चिखली, नागभीड तालुक्यातील सावरगाव, जिवती तालुक्यातील आंबेझरी, चिमूर तालुक्यातील खुटाळा व वरोरा तालुक्यातील येवती या पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.