शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याचे २४ कोटी रुपये थकीत

By admin | Updated: December 24, 2014 22:56 IST

नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने

३५ नळयोजना : कसे मिळणार नागरिकांना सुरळीत पाणी ?चंद्रपूर : नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, त्यांना त्रास होऊ नये यासाठी गावागावांत पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र पाणी पुरवठा समिती तथा ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांकडून पाणी पट्टी कर वसुल न केल्याने तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यामुळे या योजनेला आता अखेरची घरघर आली आहे. योजना सुरु ठेवण्यासाठी पाणीपट्टी कर वसूल करणे गरजेचे आहे. यासंदर्भात अध्यक्षांनी तशा सूचनाही दिल्या आहे.बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, काही सदस्यांना सभागृहात गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी बोगस ठराव घेऊन मंजुरी मिळवित असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी केला. तर लघु पाटबंधारे जिल्हा परिषद चंद्रपूर हे जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या अखत्यारित येत असल्याने यापुढे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हा विभाग जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीला जोडण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून जिल्हा परिषद सदस्य अहिरकर यांनी आक्षेप घेत निषेध नोंदविला. जिल्ह्यात ३५ नळयोजनेंतर्गंत २५० गावांना पाणी पुरवठा केला जातो. या माध्यमातून घराघरोत पाणी पोहचविण्यात येत आहे. मात्र यातील अनेक गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा योजनेतील पाणी पट्टी कर भरलाच नसल्याने अनेक योजना थंडबस्त्यात पडल्या आहे. लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले अधिकारी तथा पाणी समितीनेही पाणी पट्टीकर वसुल करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नळयोजनेपोटी आजपर्यंत तब्बल २४ कोटी रुपये थकले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांनी सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रश्न उपस्थित केला. (नगर प्रतिनिधी)