शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

200 कोटींच्या अनियमितता प्रकरणात पदाधिकाऱ्यांचे हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७ - (अ) नुसार सन २०१५ - १६चे चंद्रपूर महानगर पालिकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेसमोर हा अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. २०१५ - १६ या वर्षात केलेल्या विविध कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता झाल्याचा ठपका लेखा विभागाने ठेवला आहे. 

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा ठराव : २३ जूनच्या सभेत गदारोळ होण्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपाच्या २०१५ - १६च्या लेखापरीक्षण अहवालानुसार विविध कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता आणि ७१ लेखा आक्षेप उघडकीस आल्यानंतर पदाधिकारी व सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अनियमितताप्रकरणी पालकमंत्री  तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी झाल्या. त्यामुळे पुढे काय होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असताना  मनपानेे तत्कालीन पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी फक्त दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव ३१ मे २०२१च्या सर्वसाधारण सभेत पारित केला आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०७ - (अ) नुसार सन २०१५ - १६चे चंद्रपूर महानगर पालिकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. ३१ मे २०२१ रोजी झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेसमोर हा अहवाल मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. २०१५ - १६ या वर्षात केलेल्या विविध कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता झाल्याचा ठपका लेखा विभागाने ठेवला आहे. याशिवाय ७१ लेखा आक्षेप नोंदविल्याचे अहवालातून पुढे आले. परिणामी  काँग्रेसचे मनपा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सुनीता लोढीया, नंदू नागरकर व अन्य काँग्रेस नगरसेवकांनी ऑनलाईन सभेत अनेक प्रश्न विचारून दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आणि ऑनलाईन सभेतून बाहेर निघाले. त्यानंतर मनपासमोर निदर्शने केली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता त्यांच्याकडेही तक्रारी केल्या. तेव्हापासून हा विषय शहरात चर्चेत आहे.  

सभेच्या नोटीसमधून माहिती उघडकीस३१ जून २०२१च्या ऑनलाईन सभेत विषय क्र. ६ प्रमाणे लेखापरीक्षण अहवाल मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ करून सभेतून बाहेर निघाले होते. येत्या २३ जून २०२१ रोजी ऑनलाईन सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेची नोटीस नगरसेवकांना पाठविण्यात आली आहे. या नोटीससोबत मागील सभेचा कार्यवृत्तही जोडला आहे.  त्यातील ठराव क्र. ६ मधील ‘लेखापरीक्षणात दोषी आढळलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा ठराव मंजूर’ अशी नोंद करण्यात आली. त्यामुळे तत्कालीन पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बळी जाण्याचीच शक्यता अधिक असून, पुढील सभेत काँग्रेसचे नगरसेवक या ठरावाबाबत कोणता पवित्रा घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दोषींकडून १.७९ कोटी वसूल करावे लागणारकाँग्रेस नगरसेवकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चौकशीचे संकेत देताच राजेश मोहिते यांनी माध्यमांकडे स्पष्टीकरण पाठविले आणि तत्कालीन महापौर व पदाधिकाऱ्यांच्या बचावासाठी सरसावले. लेखापरीक्षण अहवालानुसार, आक्षेपाधीन रक्कम १९८ कोटी आणि वसुलीपात्र रक्कम १.७९ कोटी असल्याची कबुलीही आयुक्तांनी या स्पष्टीकरणात दिली तसेच त्रुटींची पूर्तता करून लेखा आक्षेप वगळता येतात, असा दावाही केला आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजी