शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघांना २० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 5:48 AM

घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली.

चंद्रपूर : घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात प्रियकरासोबत फिरायला आलेल्या युवतीवर वनरक्षक असल्याची बतावणी करून सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने चार जणांना २० वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती प्रदीप के. भेंडे यांनी सोमवारी हा निकाल दिला.कुणाल मनोहर गेडाम (२२), शुभम् बापूजी घोडाम (२१), संदीप तलांडे (२१, तिघेही रा. घंटाचौकी) व अशोक कन्नाके (२५ रा. दुर्गापूर वॉर्ड क्र. १) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.वणी (जि. यवतमाळ) येथील एक तरुण मूल तालुक्यातील एका गावात बांधकामाच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करीत होता. त्याचे गावातीलच २१ वर्षीय मुलीशी प्रेम जुळले. १४ जून २०१५ रोजी दोघेही चंद्रपूर - मूल मार्गावरील घंटाचौकी येथील श्री विष्णू मंदिर परिसरात फिरायला आले होते. ते गप्पा मारत असताना शुभम्, संदीप व अशोक हे तिघे आले. त्यांनी ‘फॉरेस्ट गार्ड’ असल्याची बतावणी करून त्या दोघांना येथे बसण्यासाठी १० हजारांची मागणी केली. नंतर तिघांनी कुणालला तिथे वन अधिकारी असल्याचे सांगून बोलावून घेतले. त्या चौघांनी पैसे नसल्याचे पाहून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने स्पष्ट नकार दिला. ती ऐकत नसल्याचे पाहून त्या चौघांनी तरुणी व तिच्या प्रियकराचा मोबाइल हिसकावून घेऊन तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.न्यायालयाने कलम ३९४ अन्वये पाच वर्षे शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने शिक्षा, कलम ३७६ अन्वये २० वर्षे शिक्षा व प्रत्येकी २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा निर्णय दिला.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारCrimeगुन्हा