शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांतील मदत पॅकेजमध्ये चंद्रपूरमधील १४ तालुक्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 19:07 IST

Chandrapur : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी काँग्रेसने नागपूर-चंद्रपूर महामार्गावर 'चक्काजाम' आंदोलन केले होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची दखल घेत शासनाने राज्यातील २५३ तालुके अतिवृष्टी व पूरबाधित म्हणून घोषित केले. यामध्ये जिल्ह्यातील १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी (दि. १०) दिली.

भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली सातबारा कोरा करण्याची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप करत काँग्रेसने आंदोलन केले होते. ओला दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. आंदोलनाची दखल घेऊन ९ ऑक्टोबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सिंदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपना, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी, पोंभुर्णा व ब्रह्मपुरी या १४ तालुक्यांचा समावेश केला.

मुख्यमंत्र्यांचा मूल तालुका वंचित

शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेज यादीतून मुख्यमंत्र्यांचा मूल तालुका वगळण्यात आला. या तालुक्यातही अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवून पक्षपात करण्यात आला, असा आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur's 14 Talukas Included in Rain-Affected Districts Relief Package

Web Summary : Following Congress protests, the government included 14 Chandrapur talukas in the rain-affected relief package. This decision, made after demands for drought relief and loan waivers, excludes the Chief Minister's Mul taluka, sparking accusations of bias.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरी