१३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST2021-02-11T04:29:41+5:302021-02-11T04:29:41+5:30

चंद्रपूर : लालपेठ येथे दारुसाठा येत असल्याच्या माहितीवरुन शहर पोलिसांनी सापळा रचून दोन चारचाकी वाहनातून विदेशी दारु व वाहन ...

13 lakh 35 thousand items confiscated | १३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

१३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर : लालपेठ येथे दारुसाठा येत असल्याच्या माहितीवरुन शहर पोलिसांनी सापळा रचून दोन चारचाकी वाहनातून विदेशी दारु व वाहन असा एकूण १३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना बघून आरोपी फरार झाले. पोलिसांनी लाला उर्फ इम्रान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लालपेठ येथे लाला उर्फ इम्रान याच्याकडे दारुसाठा येणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांना सापळा रचून धाड टाकली. पोलिसांना बघून इम्रान घटनास्थळावरुन पसार झाला. घटनास्थळावर दोन चारचाकी वाहन आढळून आले. वाहनाची पाहणी केली असता वाहनात १८० एमएलच्या ३४८ बॉटल, ४८ बिअर व दोन चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोरडे, एनपीसी विलास निकोडे, राम सानप, प्रमोद डोंगरे, बाबा डोमकावळे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

Web Title: 13 lakh 35 thousand items confiscated