शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

१४५ शाळांमधून १२३० विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

चंद्रपूर : शिक्षक हक्क अधिनियमांतर्गत पुढील सत्रामध्ये जिल्ह्यातील १४५ शाळांमधून १२३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील १४५ शाळांनी यासाठी ...

चंद्रपूर : शिक्षक हक्क अधिनियमांतर्गत पुढील सत्रामध्ये जिल्ह्यातील १४५ शाळांमधून १२३० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. जिल्ह्यातील १४५ शाळांनी यासाठी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया अद्यापतरी सुुरु झाली नसून ती कधी सुरु होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी शाळेतील एकूण क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून दरवर्षी प्रवेश दिला जातो. यावर्षी शाळा प्रशासनाला २१ जानेपासून ३० जानेपर्यंत नोंदणी करायची होती. मात्र शाळांचा अल्प प्रतिसाद बघता संबंधित प्रशासनाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १४५ शाळांनी यासाठी नोंदणी केली असून १२३० विद्यार्थ्यांना या शाळांत प्रवेश दिला जाणार आहे.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये शाळांची नोंदणी, प्रवेश अर्ज प्रक्रिया आदी पार पाडली जाते. मात्र यावर्षी या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. त्यामुळे पालकांची चलबिचल सुरु झाली आहे.

--

प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु नाही

यावर्षी जिल्ह्यातील १४५ शाळांनी नोंदणी केली असून १२३० द्द्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरु झाली नसून ती लवकरच सुरु होतील, असा विश्वास शिक्षण विभागाला आहे. तर प्रक्रिया केव्हा सुरु होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण शाळांच्या तुलनेमध्ये शहरी शाळांनी अधिक प्रमाणात नोंदणी केली आहे.