शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१०६ वर्षांच्या नागभीड- नागपूर रेल्वेला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते.

ठळक मुद्देउरल्या केवळ आठवणी : सजविलेल्या इंजिनसोबत प्रवाशांनी काढली सेल्फी

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १०६ वर्षांपासून अव्याहत सुरू असलेल्या नागभीड-नागपूर या बहुचर्चित नॅरोगेज रेल्वेला रविवारी अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी शेकडो प्रवाशांसह खासदार अशोक नेते, बिलासपूर रेल्वे झोन कमिटीचे सल्लागार सदस्य संजय गजपुरे, नगराध्यक्ष उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, सभापती अवेश पठाण, न.प. सभापती सचिन आकूलवार आदी उपस्थित होते. आता केवळ या गाडीच्या १०६ वर्षांच्या आठवणी प्रवाशांसह रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिल्लक राहिल्या आहेत.बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांगली, कानपा, भूयार, भिवापूर गावापर्यंत या गाडीने प्रवास केला. ही रेल्वे ज्या स्थानकावर थांबत होती. त्या ठिकाणी नागरिक व प्रवाशांकडून उस्फुर्तपणे स्वागत केल्या जात होते. या गाडीला १०६ वर्षांचा इतिहास असल्याने संपूर्ण तालुक्याच्या भावना या गाडीशी जुळल्या आहेत. किंबहुना नागभीड येथूनच गोंदिया, बल्लारपूर व नागपूर येथे गाड्या रवाना होत असल्याने येथे जंक्शनची निर्मिती झाली होती.एवढेच नाही तर अगदी २० वर्षांपूर्वी पर्यंत नागभीड येथे इंजिन दुरूस्तीचे वर्कशाप कार्यरत होते. यामुळे नागभीड शहराचे नाव सर्वदूर पोहोचले. कृतज्ञतेची ही भावना प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होती. अनेकांनी या रेल्वेच्या आठवणी एकमेकांना सांगताना दिसले.२२ महिन्यांत होणार काम पूर्णनव्या ब्रॉडगेजचे काम १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. बांधकाम करणारी कंपनी २२ महिन्यांत काम पूर्ण करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाºया अनेक गाड्या नागभीडमार्गे वळविण्यात येणार आहेत. ब्रॉडगेज रेल्वेमुळे नागभीड- नागपूर हे अंतर केवळ दीड तासाचे होणार आहे. त्यामुळे या तालुक्याचा नागपूर शहराशी दररोजचा संपर्क पुन्हा वाढणार आहे. यातून शेतमाल विक्रीसाठी नागपूरची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.असाही एक रेल्वे प्रवाशी...या गाडीन रविवारी गोवा येथील एका पर्यटकाने प्रवास केला. विजय अभ्यंकर असे या पर्यटकाचे नाव आहे. देशातील कुठेही नॅरोगेज गाड्या बंद झाल्याची माहिती मिळताच अभ्यंकर हे तातडीने त्या रेल्वेस्थानकावर जातात. त्या गाडीने प्रवास करतात. नागभीड-नागपूर गाडीतही त्यांनी प्रवास केला.

टॅग्स :railwayरेल्वे