बल्‍लारपुरात १०० बेडेचे कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST2021-05-11T04:30:06+5:302021-05-11T04:30:06+5:30

बल्‍लारपूर शहराजवळ भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या इमारतीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आले. यावेळी आमदार ...

100 bed covid care center started in Ballarpur | बल्‍लारपुरात १०० बेडेचे कोविड केअर सेंटर सुरू

बल्‍लारपुरात १०० बेडेचे कोविड केअर सेंटर सुरू

बल्‍लारपूर शहराजवळ भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या इमारतीत १०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, काशीसिंह, नीलेश खरबडे, समीर केणे, मनीष पांडे यांची उपस्थिती होती.

आमदार मुनगंटीवार यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतून दोन रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या. या रुग्‍णवाहिकांच्‍या चाव्‍या नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांना सुपूर्द करण्‍यात आल्‍या. त्‍याचप्रमाणे १०० पीपीई किटचे वितरणसुद्धा करण्‍यात आले. बल्‍लारपूरसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने १० ऑक्‍सिजन कॉन्‍सन्ट्रेटर उपलब्‍ध करण्‍यात आले आहे. बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यातील नागरिकांना चाचण्‍यांचा लाभ सहज घेता यावा यादृष्‍टीने बल्‍लारपूर शहरात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दुसरे आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्‍यात आले आहे.

Web Title: 100 bed covid care center started in Ballarpur