शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय अधिवेशनासाठी शिक्षकांना १० दिवसांची नैमित्तिक रजा मंजूर

By admin | Updated: December 11, 2015 01:36 IST

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २७ वे द्विवार्षिक अधिवेशन बंगळूरू येथे १७ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे.

बंगळूरूला अधिवेशन : तीन हजार प्राथमिक शिक्षक होणार सहभागीचंद्रपूर : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २७ वे द्विवार्षिक अधिवेशन बंगळूरू येथे १७ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे. देशभरातील प्राथमिक शिक्षक या अधिवेशनात सहभागी होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातून तीन हजार शिक्षक या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. या अधिवेशनासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाने संघटनेच्या शिक्षकांसाठी १० दिवसांची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे.अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांनी संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शिक्षक, निमशिक्षक, सहाय्यक शिक्षक, पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक यातील अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्यांनी अर्ज केल्यानंतर सदरची रजा गटशिक्षणाधिकारी यांनी मंजूर करावी, अधिवेशनास उपस्थित राहिल्याबद्दल सेवापुस्तकात विशेष रजेची नोंद घेण्यात यावी, अधिवेशन कालावधीत शाळेचे कामकाज सुरू राहण्याबाबत योग्य ती खातरजमा संबंधित अधिकाऱ्यांनी केल्यानंतरच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल, असेही शासन आदेशात नमूद आहे.बंगळूरू येथील अधिवेशनात स्वच्छ विद्यालय-स्वच्छ भारतच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे होत असलेले खासगीकरण आणि व्यापारीकरण, सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणातून आर्थिक विकास आदी महत्त्वांच्या विषयावर विचारमंथन होणार असून, देशभरातील शिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणाचे खासगीकरण बंद करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणे, शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी देण्यात यावी, आदी मागण्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात येणार आहे. या अधिवेशनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष विजय शास्त्रकार, उपाध्यक्ष गिरीधर गेडाम, कार्याध्यक्ष संभा पारोधे, सरचिटणीस सतीश बावणे, उपसरचिटणीस रविकांत आसेकर, सुभाष कासनगोट्टुवार आदींनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)