शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

तुमचं भविष्य तुमच्या उत्पन्नावर नाही, खर्चावर ठरतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:57 PM

लाइफस्टाइलवर तुम्ही दरमहा किती खर्च करता, त्यावर ठरेल तुमचा उद्या कसा आहे ते...

ठळक मुद्देआपल्या लाइफस्टाइलवरील खर्च तीस टक्क्यांच्या वर जाऊ देऊ नका.अनावश्यक खर्चाकडेही थोडं डोळे वटारुन पाहा.बघा, अनेक प्रश्न एकदम सोपे होऊन जातील.

- मयूर पठाडेअनेक जण आपल्याला विचारतात, तुझी कमाई किती? किती कमवतोस तू दरमहा? लग्नाच्या बाजारात, म्हणजेच तरुणांच्या आयुष्यात तर या कमाईचं महत्त्व अपरंपार आहे. वधुपिताही नवºया मुलाला हाच प्रश्न विचारतो आणि आजही आपल्याकडच्या ९९ टक्के लग्नांमध्ये हाच घटक अतिशय परिणामकारक ठरतो, पण खरंतर कमाई किती करतो, यापेक्षाही यावर भर द्यायला हवा की, तू खर्च किती करतोस? कमाईपेक्षा खर्च जास्त असेल तर अर्थातच तो आतबट्ट्याचा व्यवहार आहे आणि अशा प्रकारांतून लवकरच त्या माणसाचं दिवाळं निघणार हेदेखील उघड सत्य आहे.आपला खर्च वास्तव आहे का, योग्य कारणांवर योग्य तितकाच खर्च आपण करतो का, याकडे प्रत्येकानं अतिशय जाणीवपूर्वक पाहाणं अतिशय महत्त्वाचं आहे.आपला सर्वाधिक खर्च कशावर होतो तुम्हाला माहीत आहे? जगभरातल्या अभ्यासकांचं यावर एकमत आहे आणि ते म्हणजे प्रत्येकाचा जास्तीत जास्त खर्च लाइफस्टाइलवर होतो. अगदी गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत कोणीही याला अपवाद नाही. आपली लाइफस्टाइल आणखी उच्च व्हावी आणि आपण आणखी पुढच्या श्रेणीत जावं किंवा आहे ती लाइफस्टाइल तरी आपण मेन्टेन करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण मुख्य गोची इथेच आहे.आपल्या लाइफस्टाइलवरचा खर्च आपण आटोक्यात आणला तर अनेक गोष्टींसाठी आपल्याला पैसा उपलब्ध होऊ शकतो. कारण लाइफस्टाइलसाठी केलेला खर्च हा अत्यावश्यक खर्च नाही. तो खर्च केला नाही, तर काहीच बिघडत नाही. अर्थातच हा खर्च करुच नये असं बिलकुल नाही. मग तो किती करावा? अभ्यासकांचं म्हणणं आहे, हा खर्च आपल्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त तीस टक्के असावा. या तीस टक्क्यांच्या बाहेर हा खर्च तुम्ही जाऊ देऊ नका आणि अनावश्यक खर्चाकडेही थोडं डोळे वटारुन पाहा. तुम्ही जर मुळातच त्यापेक्षा कमी रक्कम खर्च करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, मग त्यातही थोडं वाचवून बघा.. अनेक प्रश्न एकदम सोपे होऊन जातील..कराल मग हा उपाय? निदान सुरुवात करायला तरी काय हरकत आहे?